आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठण तालुक्यातील दरोड्यात 89 हजारांची लूट; मारहाणमध्‍ये एक जण गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - तालुक्यातील बालानगर दरेगाव येथील शेतवस्तीवर सात ते आठ दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत महिला, मुलांना बेदम मारहाण करून 89 हजार 700 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवार, 23 जुलै रोजी रात्री 9 वाजेदरम्यान घडली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला.

दरेगाव वस्तीवर राहणारे भगवान प्रल्हाद जाधव हे मंगळवारी रात्री कुटुंबीयांसह घरात बसले असताना तोंडाला रुमाल बांधलेल्या दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला व दमदाटी करत जाधव यांच्या पत्नीच्या गळ्यातील, कानातील दागिने व रोख 40 हजार रुपये असा एकूण 89 हजार 700 रुपयांचा ऐवज लुटला. याप्रसंगी प्रल्हाद जाधव यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये प्रल्हाद जाधव यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.