आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 9 Aaplication For Adarsh Shikshak Puraskar Aurangabad

आदर्श शिक्षकांसाठी आग्रह केल्यावर आले 9 प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आदर्श शिक्षक होण्यासाठी प्रस्ताव दाखल करा, असा आग्रह करूनदेखील मनपा शाळांतील 530 शिक्षकांपैकी अवघ्या 9 जणांनी प्रस्ताव दिल्याने आता त्यांच्यातूनच दोन शिक्षकांची निवड करावी लागणार आहे.

महानगर पालिकेच्या शाळांतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारानंतर पगारवाढ मिळणे बंद झाल्याने या पुरस्काराबाबतची शिक्षकांमधील उत्सुकताही शांत झाली. गेल्या दोन वर्षांत तर एकही प्रस्ताव आला नव्हता. यंदा मनपाच्या शिक्षण विभागाने पाठपुरावा केला तेव्हा अत्यल्प का होईना प्रतिसाद लाभला. मनपाच्या शाळांमध्ये 530 शिक्षक कार्यरत आहेत. त्यांना आवाहन करून अखेर 9 जणांचे प्रस्ताव कसेबसे मनपाकडे आले.

या संदर्भात शिक्षणाधिकारी ए.एम. शेख म्हणाले की, या 9 जणांच्या प्रस्तावातून दोन जणांची निवड केली जाणार असून उद्या याबाबत एका बैठकीचे आयोजन करण्यात आहे. निवडलेल्या शिक्षकांना 8 डिसेंबर रोजी मनपाच्या वर्धापनदिनी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.