आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

90 टक्के वकिलांना रक्तदाब; 7 टक्के हृदयरोगाच्या दारात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दररोजच्या कामातील वाढलेल्या ताणतणावामुळे ९० टक्के वकिलांना रक्तदाबाचा आजार जडला अाहे तर टक्के वकील हृदयरोगाच्या कचाट्यात असल्याचे शुक्रवारी झालेल्या आरोग्य तपासणीत आढळून आले. 
 
जिल्हा वकील संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरात १८० वकिलांची तपासणी करण्यात आली. यात २८ ते ३० महिला वकिलांचाही समावेश होता. 

माधवबाग आरोग्य केंद्राच्या माध्यमातून डॉ. प्रणिता सुतार यांनी तपासण्या केल्या. न्यायाधीश राजीव देशमुख यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घ्‍ााटन झाले. या वेळी अॅड. डी. एस. भारुका, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. ए. बी. भोसले उपस्थित होते. शिबिरात रक्तदाब, शुगर, ईसीजी आणि एसपीओ या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ९० टक्के वकिलांना रक्तदाब असल्याचे स्पष्ट झाले, तर नजीकच्या काळात हृदयरोगाच्या समस्या उद्भ्‍ावतील असे टक्के वकील, न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचारी असल्याचे दिसून आले.
 
शिबिराच्या यशस्वितेसाठी जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. गणेश डहाळे, अॅड. आरती महातोले, अॅड. नितीन ताठे, अॅड. मंगेश आमले, अॅड. सिद्धार्थ बनसोडे, अॅड. तथागत कांबळे, अॅड. अनुराधा मगरे, अॅड. ईश्वर मोहिते, अॅड. विशाल पगारे, अॅड. कल्पना सावळे, अॅड. योगेश तुपे पाटील, अॅड. विठ्ठल वायाळ, दादाराव चव्हाण, गणेश सदाशिवे, बाबू हिवराळे यांनी, तर माधवबागतर्फे सचिन कदम, मधुर मेढेकर, योगेश बोराडे, पार्वती गवळी, ज्ञानेश्वर पानकर आणि डॉ. दयानंद वाटोरे यांनी सहकार्य केले. 
 
न्यायालयातही कामाचा प्रचंड ताण 
देशभरातील न्यायालयांत लाख खटले प्रलंबित आहेत. २१ हजार न्यायाधीश कार्यरत आहेत. यासोबत रोज दाखल होणाऱ्या नव्या खटल्यांचा दबाव वाढत आहे. यातून वाढणारा ताण आजारांना निमंत्रण देत आहे. रक्तदाब, मधुमेह, स्थूलता हे नंतर हृदयरोगात परिवर्तित होतात. 
 
पस्तिशीपासून रक्तदाब 
रक्तदाब आणिशुगर तपासणीचा अहवाल पाहिल्यावर अनेक जण चकित झाले अन् आम्ही तर रोज किती वेळा पायऱ्या चढतो, दिवसभर फिरत असतो, अशी प्रतिक्रिया दिली; पण शांतचित्ताने विचारशून्य अवस्थेत चालणे परिणामकारक ठरते. विचारांनी सैरभर असताना चालल्याने व्यायाम होत नाही. मानवडांगे, मराठवाडा विभागाचे प्रमुख 
 
कोर्टात खूप चालतो 
पूर्वी ६०-६५च्या वयात होणारा रक्तदाबाचा आजार तिशीतील वकिलांना आहे. विशेष म्हणजे आपण जाणीवपूर्वक तपासण्या करून घेतल्या पाहिजेत. याबद्दल वकिलांमध्ये जागृती नसल्याचे दिसून आले. रक्तदाबासोबतच शुगर असलेल्यांचे प्रमाणही चिंताजनक आहे. पुढे याच गोष्टी हृदयरोगाला कारणीभूत ठरतात. डॉ.प्रणिता सुतार, माधवबाग 
बातम्या आणखी आहेत...