आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 90 Percent Water Supply Clear Aurangabad City Water Utility Company

पाणीपुरवठा ९० टक्के सुरळीत, कंपनीने केला दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नऊ तारखेच्या शटडाऊननंतर कोलमडलेला पाणीपुरवठा ९० टक्के सुरळीत झाल्याचा दावा औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटी कंपनीने केला आहे. उद्या गुरुवारपासून १०० टक्के पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी कंपनीला आशा आहे.

जानेवारीला कंपनीने दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन घेतला होता. त्यानंतरही पुन्हा अडचणी आल्याने सिडको-हडकोसह शहराच्या अनेक भागांत पाणीपुरवठा पुरता कोलमडला होता. सिडकोच्या एन-७ च्या टाकीवरून पुरवठा होणाऱ्या भागांना तर व्हाॅल्व्हच्या घोळामुळे अतिरिक्त गॅप सहन करावा लागला. या प्रकाराची गंभीर दखल घेत आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मनपाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत सारी यंत्रणा हलवून टाकली. त्याचा परिणाम पाहायला मिळाला असून आज सायंकाळपर्यंत शहरातील ९० टक्के पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. एन-७ चा प्रश्नही सुटला असून तेथून उद्यापासून सुरळीत पाणीपुरवठा होईल, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
१८ नळ तोडले
औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीने बुधवारी (दि. १३) रोजी जयभवानीनगरातील १८ अवैध नळ कनेक्शन तोडले. या भागात पाण्याची चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कंपनीच्या वतीने आज ही कारवाई करण्यात आली, असे अविक बिस्वास यांनी सांगितले.