आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेचे ९० हजारांचे मंगळसूत्र पळवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - सकाळी फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून दुचाकीस्वार फरार झाल्याची घटना सिल्लोड शहरात रविवारी घडली. सिल्लोड येथील शास्त्री कॉलनी भागात राहणारे औषध विक्रेते रमाकांत बंडाळे यांच्या पत्नी सरला या नेहमीप्रमाणे व्यायामासाठी सकाळी फिरायला गेल्या होत्या.
घरी परतत असताना सिल्लोड- जळगाव रस्त्यावरील हॉटेल कौशिकीसमोर सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी नव्वद हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र तोडून पोबारा केला. त्यामुळे मंगळसूत्र चोरीची घटना घडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.