आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 900 Hecters Land Aquired For Shendra Beedkin Industrial Project

शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्रियल प्रकल्पासाठी तिस-या टप्प्यात ९०० हेक्टरचे भूसंपादन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिडकीन - दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत बिडकीन शेंद्रा मेगा प्रकल्पासाठी करमाड, बिडकीन, निलजगाव, नांदलगाव, बन्नीतांडा, बंगलातांडा येथील भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यानंतर आता तिस-या टप्प्यातील चिंचोली, जांभळी, मेहेरबान नाईक तांडा, निलजगाव येथील अंदाजे ९०० हेक्टर जमीन भूसंपादित करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला असून दोन दिवसांत अधिसूचना निघण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही दिवस लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जमिनी फळझाडे, विहिरींची रक्कम लवकरच मिळणार
बिडकीन, निलजगाव, बन्नीतांडा, नांदलगाव येथील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी वर्ग २ च्या जमिनींबाबतचा निर्णय अजून प्रशासनाकडे प्रलंबित आहे, तर फळबागा, विहिरी, शेततळे, निवारे यांचाही मोबदला अद्याप शेतक-यांना मिळालेला नाही. दरम्यान, विहिरींचे मूल्यांकन ग्रामस्थांकडे तयार आहे. मात्र, फळबागांबरोबरच ते देण्यात येणार असल्याचे एसआयडीसीच्या वतीने सांगण्यात आले, तर फळबागांचे पेमेंट शेतक-यांना लवकरच मिळवे यासाठी पाठपुरावा करत असल्याचे भूसंपादन अधिका-यांनी सांगितले.

प्रक्रिया वेगाने होणार
नवीन भूसंपादनापूर्वीच बिडकीनसह पाच गावांतील शेतक-यांना फळझाडे, विहिरी, निवारे यांची रक्कम अदा होईल. १० नोव्हेंबरपासून पाच गावांतील खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबवण्यात येतील. संपादनाची प्रकिया वेगाने पूर्ण केली जाणार आहे.
रवींद्र पवार, भूसंपादन अधिकारी

मूल्यांकनासाठी पथके
पीक, झाडे मूल्यांकनासाठी आम्ही पथके तयार केली आहेत. हे काम विनाविलंब त्वरित पूर्ण केले जाईल.
भाऊसाहेब पायघन, तालुका कृषी अधिकारी, पैठण.