आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्याचा निकाल ९१.८२ टक्के, विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मार्च २०१५ मधील शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यात औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ९१.८२ टक्के लागला असून बारावीप्रमाणेच दहावीच्या परीक्षेतही मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे.
शालेय जीवनातील अखेरची परीक्षा म्हणून दहावीच्या परीक्षेकडे पाहिले जाते. गेल्या चार -पाच दिवसांमध्ये निकालाच्या अफवा आणि सोशल मीडियावर निकालावरून होणारी टिंगलटवाळी या सर्व चर्चांना आज लागलेल्या निकालामुळे पूर्णविराम मिळाला आहे. औरंगाबाद शहरातून या परीक्षेसाठी ५८ हजार १५५ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी ५८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५३ हजार २६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा एकूण निकाल ९१.८२ टक्के इतका लागला. नेहमीप्रमाणेच मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असून ३.२२ टक्क्यांनी मुलींची टक्केवारी वाढली आहे. विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार २०० आहे. प्रथम श्रेणीत २१ हजार ३८०, द्वितीय श्रेणीत १४ हजार ७४७ तर उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजार ९३६ इतकी आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातून ५८ हजार १५५ जण परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५८ हजार जणांनी परीक्षा दिली.
मुली
९२.४३ %
मुले
८९.२१ %
बातम्या आणखी आहेत...