आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृताच्या इन्कम टॅक्स रिटर्नमुळे वारसांना 93 लाखांची भरपाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद  - ट्रकचालकाच्या चुकीमुळे अनिल लोखंडे यांना २०१३ मध्ये जीव गमवावा लागला होता. यानंतर त्यांच्या वारसांच्या दाव्यावर निकाल देताना मोटार अपघात न्यायाधिकरणाने ट्रकचालक, मालक व श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीने वारसांना ९२ लाख ७५ हजार रुपयांच्या भरपाईचे आदेश दिले. लोखंडे इन्कमटॅक्स रिटर्न दाखल करत असत. त्याचीच कागदपत्रे दाव्यात निर्णायक ठरली.
 
आैरंगाबाद-जळगाव रस्त्यावर आंबेडकर चौकात आपली कार बाजूला उभी करून अनिल लोखंडे मित्राची प्रतीक्षा करत होते. दरम्यान, साखरेचे पोती भरलेला एक ट्रक भरधाव वेगात उजव्या बाजूला वळत असताना चालकाचा ताबा सुटून लोखंडे यांच्या कारवर पलटी झाला. यात कारमधील लोखंडे यांचा मृत्यू झाला होता.
 
वार्षिक सहा लाख उत्पन्न होते 
लोखंडे २००७ पासून आयकर भरत. त्यांच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत होती. सरासरी वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपये असल्याचे कोर्टाने मान्य केले. मृताच्या पत्नीस ५० लाख २५ हजार, मुलास ३० लाख, तर आईस १२ लाख ९% व्याजासह देण्याचे आदेश दिले.
बातम्या आणखी आहेत...