आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीसाठी ९४.२७% मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील एका केंद्रावर मतदारांनी अशा रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. छाया : दिव्य मराठी - Divya Marathi
शहरातील एका केंद्रावर मतदारांनी अशा रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. छाया : दिव्य मराठी
औरंगाबाद- जिल्हाकृषी उत्पन्न बाजार समिती सदस्यत्वाची निवडणूक रविवारी पार पडली. हजार ५९३ मतदारांपैकी हजार ३९० (९४.२५ टक्के) मतदारांनी विक्रमी मतदानाचा हक्क बजावून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले. सोमवारी (१३ जुलै) सकाळी वाजता जाधववाडी येथील शेतकरी भवनात मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी वाजेपर्यंत निकाल हाती येतील. तोपर्यंत उमेदवारांची वाढलेली धाकधूक कायम राहणार आहे.

रविवारी सकाळी वाजता १२ मतदान केंद्रांवरील २४ बूथवर मतदानाला सुरुवात झाली. मतदारांना ये-जा करण्यासाठी वाहनांची व्यवस्था आणि जेवणासाठी पुरी-भाजीचा मेन्यू होता. दुपारी वाजेपर्यंत जाधववाडी येथील चार आणि इतर वीस बूथ अशा एकूण २४ बूथवर ९४.२५ टक्के मतदान झाल्याची नोंद निवडणूक विभागाने घेतली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

बहुमताने विजय होईल
काँग्रेसचेमाजी आमदार डॉ. कल्याण काळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे या दोघांनीही आपापले पॅनल बहुमताने विजय होऊन समितीवर सत्ता स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला.
काँग्रेस की भाजप ?
विधानसभाअध्यक्ष हरिभाऊ बागडे काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या पॅनलमुळे समितीची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. दोघांनीही उमेदवार ठरवण्यापासून ते प्रचारात कोठेही कसर सोडली नाही. मतदानाच्या वेळीही जातीने हजेरी लावून उमेदवार मतदारांचा उत्साह वाढवला. पण अंतिम कौल मतदारांच्या हातात होता. तो त्यांनी काँग्रेस की भाजप यापैकी कुणाच्या झोळीत टाकला हे सोमवारी समोर येईल.

कपबशी टोपी चिन्ह एकाखाली एक आल्याने मतदारांसाठी अडचणीचे ठरले. हे चिन्ह एकसारखेच दिसत असल्याने मतदारांमध्ये मोठी गडबड उडाली. राजू शिंदे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अाक्षेप नोंदवला. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपला विजयाची शाश्वती नसल्याने ही शक्कल लढवण्यात आल्याचा आरोप केला आहे.

विक्रमी मतदान का?
बाजारसमितीच्या निवडणुकीत यापूर्वी ९४ टक्क्यांपर्यंत मतदान झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मोठ्या कालखंडानंतर समितीची निवडणूक होत आहे. १८ जागांसाठी ८१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आजी-माजी आमदार, सभापतींनी निवडणूक प्रतिष्ठेची बनवली. प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन मतदान करून घेतले. यामुळे विक्रमी मतदान होऊ शकले.