आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून ऐका आपल्या मर्जीचे 94.3 माय एफएम,औरंगाबादच्या पहिल्या लाइव्ह एफएमचे आजपासून प्रसारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतातील सात राज्यांमध्ये प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवलेल्या दैनिक भास्कर समूहाच्या माय एफएम रेडिओ चॅनलचे प्रसारण सोमवारी (१२ डिसेंबर) सुरू होत आहे. तुम्ही सकाळी १०.३० वाजेपासून ९४.३ बँडवर हे थेट प्रसारण ऐकण्याचा आनंद घेऊ शकाल. गेल्या दहा वर्षांत माय एफएमने सात राज्यांतील १७ शहरांमध्ये लोकप्रियतेचा विक्रम प्रस्थापित केला आहे. माय एफएमवर नेमके काय ऐकायला आवडेल, याविषयी २० हजार औरंगाबादकरांची मर्जी जाणून घेतल्यावरच तसे कार्यक्रम तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे माय एफएम खऱ्या अर्थाने औरंगाबादकरांचे पहिले रेडिओ चॅनल ठरले आहे.

मायएफने नेहमीच रसिक श्रोत्यांची आवडनिवड केंद्रस्थानी ठेवली आहे. याच अनुषंगाने औरंगाबाद माय एफएमने एक नवे पाऊल उचलून थेट रसिकांशी संपर्क साधत त्यांना विचारले की, तुम्हाला रेडिओवर कोणत्या प्रकारची गाणी ऐकणे मनापासून आवडेल. रेडिओ जॉकीने कोणत्या भाषेत बोलले पाहिजे, असे तुम्हाला वाटते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनोरंजन करत असताना औरंगाबाद शहरातील कोणत्या प्रश्नांवर तुमचा आवाज माय एफएमने बुलंद केला पाहिजे, अशी तुमची इच्छा आहे. या आवाहनाला तब्बल २० हजार औरंगाबादकरांनी प्रतिसाद दिला.
त्यानुसार ९४.३ माय एफएमने पूर्णपणे कार्यक्रमांचे नियोजन केले. त्यानुसार सोमवारी सकाळी साडेदहा वाजेपासून ९४.३ माय एफएमवर औरंगाबादचे रेडिओ रसिक एका अनोख्या, अवीट अनुभवाचे साक्षीदार होणार आहेत. कारण जे औरंगाबादकरांना हवे आहे, जी औरंगाबादकरांची मर्जी आहे, तेच त्यांना ऐकण्यास मिळणार आहे.
२० हजार लोकांनी नोंदवली त्यांची मर्जी
गेल्या दोन महिन्यांत औरंगाबाद शहरातील २० हजार लोकांनी ऑनलाइन संपर्क साधला.
अर्ज भरून देत त्यांची मर्जी कळवली. आणि त्यांच्या मर्जीनुसारच आम्ही तयार केले आहे ९४.३ माय एफएम ‘जगा मनापासून’ औरंगाबादकरांच्या मर्जीचे पहिले लाइव्ह एफएम स्टेशन.
नाशिक, सोलापूर, अकाेला, जळगाव, धुळ्यामध्येही...
औरंगाबाद माय एफएमचे २१वे रेडिओ स्टेशन ठरले आहे. औरंगाबादसोबत अहमदनगर, सांगली, नांदेडचे लाँचिंग झाले आहे. जानेवारी महिन्यात नाशिक, सोलापूर, जळगाव आणि धुळ्याच्या रसिकांना माय एफएम ऐकण्यास मिळणार आहे. नुकतेच हिसार, करनाल, राजकोट येथे रसिक माय एफएमचा आनंद घेत आहेत.
पुढीच्‍या स्‍लाइडवर वाचा, उडतील हास्याचे फवारे
बातम्या आणखी आहेत...