आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत ‘माय एफएम 94.3’चे प्रसारण जल्लोषात सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सात राज्यांतील रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या माय एफएम ९४.३ रेडिओ चॅनलच्या औरंगाबादेतील प्रसारणाला सोमवारी (१२ डिसेंबर) जल्लोषात प्रारंभ झाला. औरंगाबादकरांनी त्याचे मन:पूर्वक स्वागतही केले.

सकाळी साडेनऊच्या सुमारास न्यू एसबीएच कॉलनी, ज्योतीनगर येथील माय एफएमच्या स्टुडिओत पूजा, होमहवन करण्यात आले. त्यात महाराष्ट्राचे प्रमुख सौरभ वाडेकर, रिजनल प्रोग्रॅमिंग हेड गायत्री महादेवकर, स्टेशन हेड नितीन लोखंडे, प्रोग्रॅमिंग हेड प्रेषित रुद्रवार यांनी सहभाग घेतला. सीईओ हरीश भाटिया यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यांनी रेडिओ लिंक देत औरंगाबादच्या रसिकांचे स्वागत केले.
ते म्हणाले की, तब्बल २० हजार औरंगाबादकरांशी आम्ही संपर्क साधला होता. तुम्हाला माय एफएमवर काय ऐकण्यास आवडेल, अशी विचारणा केली होती. त्यांनी त्यांची मर्जी कळवल्यावर त्यानुसारच कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर आरजे श्रेयस, कीर्ती, नलिनी आणि रोहित यांनी रसिकांशी संवाद साधला. हृदयाचे चार कप्पे असतात. त्यात आम्ही तुमच्या मित्राप्रमाणे राहण्यास येत आहोत. तुमच्या मर्जीनुसारच कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर धूमधडाक्यात प्रसारण सुरू झाले.
बातम्या आणखी आहेत...