आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसो का पेड: 94.3 MY FMचा रिअॅलिटी शो; औरंगाबादकरांना तीन लाख रुपये जिंकण्याची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - माय एफएम ९४.३ आणि बुलडाणा अर्बन तर्फे ‘पैसो का पेड - भारतातील पहिला रेडिओ रिअॅलिटी शो’ आयोजित करण्यात आला आहे. यात तीन लाख रुपये जिंकण्याची संधी मिळणार असून त्याकरिता तत्काळ नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 
 
कायम नावीन्यपूर्ण आणि श्रोत्यांना लाभदायक ठरणाऱ्या उपक्रमांचे आयोजन हे ९४.३ माय एफएमचे वैशिष्ट्य आहे. त्याच अंतर्गत ९४.३ माय एफ एमने पैसो का पेड हा भारतातील पहिला रेडिओ रिअॅलिटी शो आयोजित केला आहे. यामध्ये एक झाड मिळवून देईल चक्क लाख रुपये. या ‘पैसो का पेड’सारख्या अनोख्या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होऊन एक नवीन इतिहास रचण्यासाठी औरंगाबादमधील लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहेत . 
 
माय एफ एम आणि बुलडाणा अर्बनने आणलेल्या ‘पैसो का पेड’ या रिअॅलिटी शोबद्दल संपूर्ण शहरात कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. हे ‘पैसो का पेड’ कसे दिसत असेल. त्याला पैसे लागलेले असतील का? खरेच लाख रुपये मिळतील का? असे प्रश्न औरंगाबादरांकडून विचारले जात आहेत. औरंगाबादरांना ही ‘पैसो का पेड’ सारखी अनोखी संधी चुकवायची नाही. म्हणूनच संपूर्ण शहरातून आतापर्यंत हजाराहून अधिक रजिस्ट्रेशन्स झाले आहेत. यामध्ये जी व्यक्ती शेवटपर्यंत झाडाला चिकटून राहील ती जिंकणार आहे, तब्बल लाख रुपये. तुम्हालाही लाख रुपये जिंकायचे तर तातडीने नाव नोंदणी करा. कारण लाख रुपये जिंकायचे असतील तर रजिस्ट्रेशन (नाव नोंदणी) ही त्याची पहिली पायरी आहे. लवकरच “पैसो का पेड”चे ऑडिशन्स शहरात सुरु होत आहेत . अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ९४.३ माय एफ एम ऐकत आणि वाचत रहा ‘दैनिक दिव्य मराठी’. 

पुढील स्लाइडवर वाचा... लाख रुपये जिंकण्याची पहिली पायरी
बातम्या आणखी आहेत...