आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 952 Candidate In Aurangabad Corporation Election

मनपा : ९५२ उमेदवार रिंगणात, ज्योतीनगरातून शिवसेनेच्या सुमित्रा हाळनोर बिनविरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीच्या रिंगणातून जास्तीत जास्त बंडखोरांना माघार घ्यायला लावण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीचे प्रयत्न केल्यामुळे शुक्रवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ५२३ जणांनी माघार घेतली. आता रिंगणात ९५२ उमेदवार राहिले आहेत.
या घडामोडींत एकमेव प्रतिस्पर्धी उमेदवाराने माघार घेतल्याने ज्योतीनगरात शिवसेनेच्या सुमित्रा हाळनोर बिनविरोध निवडून आल्या. तर वेदांतनगरात शिवसेनेचे विकास जैन यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी माघार घेतली पण अर्ज अवैध ठरविण्यात आलेले माणिकचंद महतोले यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे त्यांचा निर्णय अडकला.
सर्वाधिक उमेदवार कबीरनगर, बापूनगरात : सर्वाधिक१९ उमेदवार कबीरनगर बापूनगर वाॅर्डांत आहेत. सर्वात कमी उमेदवार रमानगर क्रांती चौक या दोन वाॅर्डांत आहेत तर चौधरी काॅलनी वाॅर्डात उमेदवार रिंगणात राहाणार आहेत.