आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद विभागात 3.88 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी;चार जिल्ह्यांत 1784 कोटींची कर्जमाफी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यात १५ फेब्रुवारीपर्यंत कर्जमाफी योजनेंतर्गत् औरंगाबाद विभागातल्या चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तब्बल १७८४ कोटी कर्जमाफीचा लाभ  झाला आहे. या चार जिल्ह्यांतील ३ लाख ८८ हजार ८५४ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला  आहे. विशेष म्हणजे अजूनही जवळपास ९५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे बाकी असून त्याची छाननी सुरू आहे. त्यामुळे कर्जमाफीचा आकडा आणखी वाढणार आहे. 


कर्जमाफीच्या घोषणेनंतर सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास वेळ लागत होता. आता हिवाळी अधिवेशनानंतर गती प्राप्त झाली  आहे.

 
औरंगाबाद जिल्ह्यात ४०४ कोटींची  कर्जमाफी औरंगाबाद विभागात औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली हे चार जिल्हे येतात. यामध्ये ३ लाख ८८ हजार ८५४ शेतकऱ्यांना १७८४ कोटींचा लाभ झाला आहे. यामध्ये  औरंगाबाद जिल्ह्यात १ लाख १८ हजार ६९९ शेतकऱ्यांना ४०१ कोटींची कर्जमाफी झाली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ८१०९८ खातेदार शेतकऱ्यांना १४६ कोटी कर्जमाफीचा लाभ झाला आहे. राष्ट्रीयकृत बँकेच्या २४७०५ शेतकऱ्यांना १७३ कोटी आणि ग्रामीण बँकेच्या  १२ ८९६ शेतकरी खातेदारांना ८२ कोटी ७९ लाख रुपयांची कर्जमाफी झाली आहे. 

 

जिल्हा  बँकेच्या माध्यमातून २५६ कोटींची कर्जमाफी  
औरंगाबाद विभागातील चार जिल्ह्यांत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून २५६ कोटींची कर्जमाफी झाली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातच सर्वाधिक १४६ कोटींची कर्जमाफी झाली आहे. तर  जालना ४२ कोटी, परभणी ४५ कोटी  आणि  हिंगोली जिल्ह्यात २३ कोटींची कर्जमाफी झाली आहे. तर  राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून ११३४ कोटींची कर्जमाफी  झाली आहे. 

 

औरंगाबाद विभागात मोठी कर्जमाफी 
औरंगाबाद विभागात १७८४ कोटीची कर्जमाफी झाली आहे. अजून हा आकडा वाढण्याची  शक्यता आहे.  अडीच हजार कोटींपर्यंत हा आकडा जाण्याची शक्यता आहे. सध्या वेगाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत आहे. 
- राजेश सुरवसे, विभागीय उपनिबंधक, औरंगाबाद   

 

 

उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच कर्जमाफी 
जिल्ह्यात १४६ कोटींची कर्जमाफी जिल्हा मध्यवर्ती  बँकेकडून देण्यात आली आहे. उर्वरित १५ हजार शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळेल. अर्जात त्रुटी असल्यामुळे छाननी सुरू असून लवकरच त्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळेल.  राजेश्वर कल्याणकर, एम.डी.

- जिल्हा मध्यवर्ती बँक, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...