आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'व्हॅलेंटाइन डे'चा मुहूर्त साधत 5 जणांचा नोंदणी पद्धतीने विवाह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औैरंगाबाद- जन्मोजन्मी साथ देण्याच्या आणाभाका घेत 'व्हॅलेंटाइन डे'च्या मुहूर्तावर बुधवारी (१४ फेब्रुवारी) पाच जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. हा मुहूर्त साधण्यासाठी त्यांनी एक महिन्यापूर्वीच रजिस्ट्री कार्यालयात नोंदणी केली होती. २०१८ मध्ये आत्तापर्यंत २६ जणांनी नोंदणी विवाह केले आहेत. दरम्यान, व्हॅलेंटाइन डे हे प्रेमाचे प्रतीक आहे. त्यामुळे हा मुहूर्त साधण्यासाठी नोंदणी केल्याचे नवविवाहित अन्वय वाळुंजकर यांनी सांगितले. 'व्हॅलेंटाइन डे'ला नोंदणी पद्धतीने विवाह करण्यास अनेक जोडपी पसंती देत आहेत. बुधवारी रजिस्ट्री कार्यालयात पाच जणांनी हा मुहूर्त साधला. एरवी रोज एखादा विवाह होणाऱ्या रजिस्ट्री कार्यालयात बुधवारी एकाच दिवशी पाच जोडपी विवाहबंधनात अडकली. त्यामुळे या कार्यालयातही वेगळेच वातावरण पाहायला मिळाले. अन्वय वाळुंजकर आणि सायली सोनार हे दोघे शहरातील एका सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत आहेत. 


वर्षभरात २११ जणांनी केले नोंदणी विवाह 
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यान जिल्ह्यातील २११ जणांनी तर नव्या वर्षात २६ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केले. नोंदणी विवाहासाठी अवघे १५० रुपये शुल्क भरावे लागते. त्यांना लगेच प्रमाणपत्रही दिले जाते. ठरावीक दिवशी विवाह करायचा असेल तर ३० दिवस आधी नोंदणी करावी लागते, असे प्रभारी अधिकारी व्ही. भूमकर यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...