आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणास कारचालकाने उडवले; उपचारास उशीर झाल्याने मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाला मद्यपी कारचालकाने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. उपचार करण्यास उशिर झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. कारचालक पसार झाला असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदण्यात येत होता. 


गजानन रघुनाथ गाडेकर (वय २१, रा.रांजनी, पाेस्ट. बाेदवड, ता. जामनेर ) हा तरुण मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता शिवाजी पुतळ्याकडून स्टेडीयमकडे सायकलीने जात हाेता. त्याला मागून भरधाव वेगाने अालेल्या कारने (एमएच- १९, सीएफ- ५५५३) जाेरदार धडक दिली. ही धडक एवढी जाेरदार हाेती की, सायकलस्वार गजानन हा धडकेने उडून कारच्या बाेनेट व काचेवर जाऊन अादळला. त्यानंतर कारच्या पुढच्या चाकांखाली अाला. 


उपचाराला झाला उशिर 
अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन गजाननला कारच्या बाहेर काढले. त्याला उपचारार्थ दाखल करण्यासाठी रिक्षांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चार ते पाच रिक्षा न थांबताच निघून गेल्या. त्यानंतर थांबलेल्या रिक्षेत त्याला टाकून प्रथम खासगी हाॅस्पिटलमध्ये नेण्यात अाले. येथे डाॅक्टर नसल्याचे सांगून दाखल करून घेतले नाही. त्या नंतर त्याला त्याच अवस्थेत आकाशवाणी चाैकातील खासगी हाॅस्पिटलमध्ये नेले. येथील डाॅक्टरांनी त्याची तपासणी करून मृत घाेषित केले. अपघात घडल्यानंतर लगेच उपचार झाले असते तर प्राण वाचले असते, असे मदत करणाऱ्यांचे म्हणणे अाहे. 


स्पर्धा परीक्षेची करत हाेता तयारी गजानन हा गेल्या काही महिन्यांपासून दीक्षा फाउंडेशनच्या रिडींग रुममध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी रात्रकालीन ग्रंथालयात वाचनासाठी जायचा. तसेच ताे के.के. वसतिगृहात राहत हाेता. 


कारचालकाने मद्यप्राशन केल्याचा अाराेप 
सायकलस्वाराला धडक देणारा चालकाने मद्यपान केले असल्याचे घटनास्थळी मदत करणाऱ्याचे म्हणणे हाेते. तसेच घटनास्थळावर कार साेडून ताे पळून गेला. त्या कारमध्ये मद्याच्या बाटल्याही पाेलिसांना अाढळून अाल्या. ही कार नितीन विलास शिंदे हा तरुण चालवत असल्याची माहिती समाेर अाली असून ताे रेल्वेस्थानक परिसरातील एका हाॅटेल चालकाचा मुलगा असल्याचे समजते. 

 

बातम्या आणखी आहेत...