आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत रामनगर कमानीजवळ कार झाडाला धडकली; 2 डॉक्टरांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातग्रस्त वाहन. - Divya Marathi
अपघातग्रस्त वाहन.

औरंगाबाद- स्विफ्ट कार झाडाला धडकून दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला तर एक डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना औरंगाबादेतील रामनगर कमानीजवळ पहाटे अडीच ते तीन दरम्यान घडली. गोविंदकुमार सतनामसिंग (वय 25, रा. मूळ हरियाणा), लक्ष्मीकांत दगडीया (वय 25, रा. रामनगर) अशी मृत्यू झालेल्या डॉक्टरची नावे आहेत. तर कारमधील अरविंद पवार (रा. म्हाडा कॉलनी) हे डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघे पहाटे कारने जाताना रामनगर येथील कमानीजवळ त्यांची कार एका झाडाला धडकली. धडक एवढी जोरात होती की गोविंदकुमार व लक्ष्मीकांत यांचा जागीच मृत्यू झाला.

 


या घटनेनंतर मुकुंदवाडी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोड, पोलिस शिपाई मुंढे, ढवळे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नोंद झाली. अरविंद पवार अपेक्स हॉस्पिटल येथे प्रॅक्टिस करतात; मृत गोविंदकुमार आणि लक्ष्मीकांत सावंगीकर रुग्णालयात प्रॅक्टिस करीत होते, अशी माहिती मुकुंदवाडी पोलिसानी दिली.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...