आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायर फुटले,बाराचाकी कंटेनरने 8 वाहने चिरडली,17 जखमी; करमाडजवळ अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाड/औरंगाबाद- टायर फुटल्याने अनियंत्रित झालेल्या अवजड यंत्र घेऊन जाणाऱ्या कंटेनरने रस्त्याच्या कडेला बसलेले फळ विक्रेते, रसवंतीतील लाेक आणि इतर ८ वाहनांना धडक दिली. यात १७ जण गंभीर जखमी झाले. दहा गंभीर जखमींवर अाैरंगाबादेत खासगी व शासकीय रुग्णालयांतील आयसीयूत उपचार सुरू अाहेत. सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास करमाडजवळील शीतल लॉन्ससमोर हा भीषण अपघात घडला. सर्व जखमी आपतगाव, टोणगाव, लाडसावंगीचे नागरिक आहेत. 


करमाडला दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. रस्त्याच्या कडेला शीतल लाॅन्सच्या विरुद्ध दिशेला गॅरेजसमोरील मोकळ्या जागेवर टरबूज विक्रेते, कापूस विक्रेते व इतर फळविक्रेते बसतात. या ठिकाणी रसवंतीही अाहे. दुपारी बाराच्या सुमारास एक ट्रॅक्टर (एमएच २० ईजी - ४९९४) शेणखत घेऊन जात होते, तर रसवंतीच्या जवळ उभ्या टेम्पोमधून काही व्यापारी टरबूज उतरवून घेत होते. याच वेेळी रस्त्याची कामे करण्यासाठी लागणारे अवजड यंत्र घेऊन बारा चाकांचा कंटेनर (एमएच ४३ वाय २२६५) करमाडमध्ये येत होता. शीतल लाॅन्ससमाेर या कंटेनरचे डाव्या बाजूचे समोरील टायर फुटले व चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर ५ दुचाकी, २ अॅपेरिक्षा आणि एका ट्रॅक्टरला चिरडून पुढे जात ट्रॅक्टरवर जाऊन आदळले. यात १७ जण गंभीर जखमी झाले.

 

कंटेनर चालक अपघातानंतर फरार
कंटेनरने आधी समोरच्या ५ दुचाकीस्वारांना उडवले. त्यानंतर ट्रॅक्टरला धडक दिली. कंटेनरवर रस्ता तयार करण्याचे अवजड यंत्र होते. कंटेनरची ट्रॉली रसवंतीवर जाऊन आदळली. यात दुचाकी व रिक्षांचे नुकसान झाले. अपघातग्रस्त कंटेनरखाली ४ जण अडकले हाेते. इतर जण धडक दिलेल्या वाहनांखाली अडकून जखमी झाले. रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या जखमींना गावकऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. कंटेनर चालक अपघातानंतर पळून गेला. 

 

जखमींपैकी तिघांची प्रकृती अधिक गंभीर

जखमींपैकी तिघांची प्रकृती अधिक गंभीर आहे त्यांच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ट्रकने ट्रॅक्टरला दूरवर फरफटत नेल्याने मोठा आवाज झाला. या आवाजामुळे रस्त्यामधील नागरिक दूर जाण्यात यशस्वी झाली.  सतिश आहेर, कुंडलिक आहेर, तुकाराम सरोदे, काकासाहेब जाधव, संदीप व्यवहारे, सचिन खरात, सुनील डांगे, दिगंबर हजारे, मधुकर हजारे, नामदेव रंगभरे, माधव रंगभरे अशी जखमींची नावे आहेत.

 

 

पुढील स्लाईडवर या घटनेचे आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...