आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठण रस्त्यावर चारचाकीने दोन दुचाकींना मागून उडवले, ३ जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पैठण रस्त्यावरील बेस्ट प्राइज मॉलसमोरून मोपेडवर (एमएच २० बीआर ५३२६) रस्ता ओलांडून महानुभाव आश्रमाकडे वळण घेत असलेल्या दोन महिलांना टाटा सफारीने (एमएच २० ईजे ४१६५) धडक दिली. त्यानंतर महिलेच्या दुचाकीसमोरून जाणाऱ्या दुचाकीस्वारालाही (एमएच २० सीसी ४९५९) टाटा सफारी चालकाने उडवले. या अपघातात दोन्ही महिलांसह तरुणही जखमी झाला. तिघांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 


जखमी अवस्थेत केला फोन 
टाटा सफारीने उडवल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला उठताही येत नव्हते. अशा स्थितीत त्याने खिशातील मोबाइल काढून कुटुंबाला फोन केला आणि अपघाताची माहिती दिली.