आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी गाईड: गारपिटीनंतर शेतकऱ्यांनी अशी घ्यावी पिकांची काळजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैरंगाबाद- राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. एस.बी पवार आणि औरंगाबादेतील फळबाग संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एम. डी पाटील यांनी गारपिटीनंतर पिकांची काळजी कशी घ्यावी याची माहिती दिली. 


द्राक्ष : गारांचा मार लागलेले घड काढून घ्यावेत. जास्त मार लागलेल्या मण्यांची विरळणी करावी. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बावीस्टीनची फवारणी करावी. बागेवर शेडनेटचे आच्छादन करावे.
मोसंबी : बावीस्टिनची फवारणी करावी, फळगळ रोखण्यासाठी जिब्रेलिक अॅसिड १५ पीपीएमची फवारणी करावी. 
डाळिंब : बाग स्वच्छ करावी. कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
केळी : गारांचा मार लागलेली फळे, घड व इतर भाग काढून टाकावा. बावीस्टीनसह कीटकनाशक मिसळून फवारणी करावी. 
आंबा : बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाण्यात मिसळणारे गंधक (८० टक्के) २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
गहू, हरभरा : कापणी झालेला शेतमाल पावसामुळे भिजला असेल तर शेतकऱ्यांनी तो सूर्यप्रकाशात वाळवून त्यातील आर्द्रता कमी करावी. ढीग करून ताडपत्रीने झाकून ठेवावे.

बातम्या आणखी आहेत...