आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोर्ड परीक्षेसाठी यंदा सहायक परिरक्षक; परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कधी स्टिकर हरवले, तर कधी प्रश्नपत्रिकेचे बंडलच गहाळ झाल्याचे प्रकार घडतात. हे प्रकार टाळण्यासाठी बोर्डाने तयारी सुरू केली असून, यंदाच्या परीक्षेपासून सहायक परिरक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांच्यावर उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिकांची ने-आण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आतापर्यंत ही जबाबदारी केंद्र सहसंचालकांवर होती. 


माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावीच्या लेखी परीक्षा १ मार्चपासून आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. या परीक्षेसाठी बोर्डाची तयारी सुरू आहे. परीक्षेच्या काळात काेणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी सहायक सचिव वंदना वाहूळ यांनी प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेतल्या. कॉपीमुक्त परीक्षेसाठी आवाहान केले. परीक्षेच्या काळात अधिकाधिक काळजी घेण्यासाठी स्वतंत्र सहायक परिरक्षक नेमले आहेत, अशी माहिती सचिव सुगत्ता पुन्ने यांनी दिली. यंदा विभागात ६१ कस्टडी आहेत. 

बातम्या आणखी आहेत...