आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AURANGABAD: दरोडेखोर समजून आठ जणांना मारहाण; 2 ठार, सहा जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाठ संशयितांना ग्रामस्थांनी असे लाथा-बुक्क्यांनी तुडवले. - Divya Marathi
अाठ संशयितांना ग्रामस्थांनी असे लाथा-बुक्क्यांनी तुडवले.

वैजापूर - रात्री संशयितरीत्या फिरणाऱ्या ८ जणांना दरोडेखोर समजून गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू, तर ६ जण जखमी झाले. वैजापूर तालुक्यातील लाखपानव व चांडगाव शिवारात हा प्रकार घडला. येथे काही दिवसांपासून दरोडेखोरांची टोळी फिरत असल्याची अफवा पसरली होती. या धास्तीतून रात्रभर गस्त घालणाऱ्या गावकऱ्यांच्या तावडीत गुरुवारी मध्यरात्री ८ जण सापडले. मारहाणीत मिटमिट्याच्या भारत सोनवणे (३०) व राजनगर, औरंगाबादच्या शिवाजी शिंदे (४५) यांचा मृत्यू झाला.


गुरुवारी मध्यरात्री शेतवस्तीजवळ एक टोळी फिरत असल्याची बातमी मोबाइलवर पसरली. लाठ्या-काठ्या घेऊन काही गावकरी दुचाकीवरून संशयित दरोडेखोरांना पकडण्यासाठी निघाले. जमावाला पाहून ८ जण पळू लागले. परंतु, ग्रामस्थांनी  घेरल्यामुळे ते तावडीत सापडले. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. 

 

मारहाणीतील जखमी 
दगू काळे (राजापूर, जि.  बीड), राजेश मुन्ना भोसले (२५, बीड), गंगाराम रामदास भोसले (२२, पन्नेवाडी, बीड), गणेश सोनवणे (२६, शिऊर, वैजापूर), रमेश भावराव पवार (२८, अंतरवडी, ता. गेवराई), गमनीदास व्यंकटी काळे (५०, मुकुंदवाडी, औरंगाबाद).

बातम्या आणखी आहेत...