आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कचराकोंडीचा 26 वा दिवस; दिसेल तिथे कचरा टाकण्यावर पोलिस आयुक्तांचा तीव्र आक्षेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- तब्बल २६ व्या दिवशीही औरंगाबाद शहरातील कचराकोंडी कायम आहे. शासनानेच कचऱ्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यासाठीची यंत्रे खरेदी करून द्यावीत, अशी भूमिका महापालिकेने घेतली अाहे. तर नागरिकांना विश्वासात न घेता दिसेल तिथे कचरा टाकण्याच्या पालिकेच्या प्रकारावर पोलिस आयुक्तांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.


नारेगाव येथील नागरिकांनी १६ फेब्रुवारी रोजी आंदोलन केल्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिलेल्या पंचसूत्रीची परिणामकारक अंमलबजावणीही झालेली नाही.


दरम्यान, मांडकी येथे कचरा टाकल्यावर म्हैसकर यांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हा शहरात दिसेल त्या ठिकाणी मनपाने कचरा टाकला. त्याबद्दल पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.