आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादची कचराकोंडी: नारेगावमध्ये कचरा टाकण्यास न्यायालयाची अंतरिम मनाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-  मुख्य याचिकेच्या निकाल जाहीर करेपर्यंत नारेगाव कचरा डेपोवर कचरा टाकण्यास महापालिकेला कोर्टाने मनाई केली आहे. मंगळवारी दिवसभर झालेल्या प्रदीर्घ युक्तिवादानंतर कोर्टाने हा निर्णय दिला. तसेच शहरातील कचराकोंडी संदर्भात दाखल करण्यात आलेल्या राहुल कुलकर्णी यांच्या जनहित याचिकेवर बुधवारी सुनावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

 

 

नारेगाव परिसरातील मांडकी, गोपाळपूर,पोखरी, वरूडकाझी, महाल पीपरी या गावांनी कचरा डेपो विरोधात जनआंदोलन उभारल्यानंतर शहरात कचराकोंडी झाली. त्याविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर विजय लक्ष्मणराव डक आणि इतर नागरिकांनी नारेगाव पंचक्रोशीतील गावाच्या वतीने हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. मागील आठवड्यापासून मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात यावर सुनावणी सुरू आहे. नारेगाव इथे विविध गावांचा कचरा टाकण्यात येत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला असून हवा, पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित झाले आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...