आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसापच्या कोशाध्यक्षपदावरून बडेंना हटवले; देविदास कुलकर्णी नवे कोशाध्यक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाडा साहित्य परिषदेतील अंतर्गत वाद आता चक्क सोशल मीडियावर आला आहे. या वादामुळे रविवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व सदस्यांनी ठराव घेत डॉ. भास्कर बडे यांची कोशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करत नवे कोशाध्यक्ष म्हणून देविदास कुलकर्णी यांची निवड केली आहे. आपल्याला संघटनेतून हटवण्यात येणार असल्याचे डॉ. बडे यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. या प्रकारामुळे मसापची बदनामी झाल्याने त्यांना पदावरून हटवल्याची माहिती मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. 

 

मराठवाडा साहित्य परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीत २५ सदस्य आहेत. अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे आणि कोशाध्यक्ष डॉ.भास्कर बडे आहेत. कोशाध्यक्षांना परिषदेत जुमानले जात नाही. कोरे कागद आणि चेकवर सह्या घेतल्या जात होत्या. यास विरोध केल्याने माझ्या विरोधात कारवाई करण्यात आली, असा आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉ. बडे यांनी केला होता. 

 

त्यांना संधी दिली होती पण... 
 डॉ. बडेंना बैठकीला बोलावण्यात आले होते. ११ वाजेची बैठक असताना ११:३० पर्यंत ते आले नाहीत. बैठक सुरू असतानाच फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर त्यांनी आरोप करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सर्व कार्यकारिणीने त्यांना पदमुक्त केले आहे. 
- कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, मसाप 


गैरकारभारास विरोध केल्याने हटवले 
माझ्याकडे कोरे पेपर, अर्थव्यवहारासंबंधीचे कागदपत्र, चेक सहीसाठी पाठवण्यात येत होते. त्याची चौकशी करून विरोध केल्याने माझ्याविरुद्ध षड््यंत्र रचले. मी नवीन १६ सभासदांची नोंदणी केली होती, परंतु अंबाजोगाईतील संमेलनात नोंदणी रद्द केली. त्यांच्या चुकीच्या गोष्टींना विरोध केल्याने सर्वांना एकत्र करत मला चुकीचे ठरवले. मला हटवल्याचे पत्र अद्याप मिळाले नाही. मात्र, घटनेनुसार मी त्याचे उत्तर देईन.
- डॉ. भास्कर बडे 

बातम्या आणखी आहेत...