आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद दंगल: नगरसेवक राजेंद्र जंजाळला सशर्त जामीन, १५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दंगलीत राजाबाजार येथील पेंटची दुकाने व वाहनांची जाळपोळ केल्याच्या आरोपात हर्सूल कारागृहात असलेला नगरसेवक राजेंद्र जंजाळ याचा सशर्त जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संगीतराव एस. पाटील यांनी १५ हजारांच्या जातमुचलक्यावर मंजूर केला. 

 

२१ मे रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी त्याचा नियमित जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्याने खंडपीठात धाव घेतली. जंजाळ याच्या वतीने अॅड. राजेंद्र देशमुख यांनी बाजू मांडली. 

 

बातम्या आणखी आहेत...