आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार- दुचाकी धडकेत एक ठार, दोन जखमी; गोळेगाव जवळील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोळेगाव- जळगाव औरंगाबाद महामार्गावर गोळेगाव -लिहाखेडीदरम्यान इंडिका कार व दुचाकी यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. सय्यद हर्षद अल्ताफ हुसेन  व सय्यद अब्दुल रेहमान तसेच शेख मुजहीर शेख लतीफ तिघेही   रा. सिल्लोड हे सिल्लोडहून अजिंठ्याकडे दुचाकी क्र. एमएच २० सीपी ३२२४ ने जात असताना गोळेगाव लिहाखेडीदरम्यान हॉटेल सी.के.पार्क धाब्यासमोर अजिंठ्याहून सिल्लोडकडे जात असलेल्या कार क्र. एमएच २० बीएन ३००८ ने  समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात सय्यद हर्षद अल्ताफ हुसेन यांच्या घटनास्थळी मृत्यू झाला. सय्यद हर्षद हे सिल्लोड येथील नॅशनल स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते.  सय्यद अब्दुल रेहमान  व शेख मुजहीर शेख लतीफ हे गंभीर जखमी झाले असून त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून दोन्ही बाजूने साइड पंखे दोन ते तीन फूट खोल खोदलेले आहे. रास्ता अरुंद झाल्याने छोट्या मोठ्या अपघातात वाढ झाली आहे.


जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे सहायक रुग्णदूत म्हणून काम करणारे रामेश्वर नाईक हे महामार्गावरून जात असताना गाडी थांबवून जखमींना आपल्या चालकास रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. या घटनेची नोंद अजिंठा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...