आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवाची उत्क्रांती माकडापासून नाहीच, डार्विनचा सिद्धांत खाेटा! सत्यपाल सिंह यांचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मनुष्याची उत्क्रांती माकडापासून झाली, असा डार्विनचा सिद्धांत शाळा, विद्यापीठांत शिकवला जातो. डार्विनचे संशोधन साफ खोटे असल्याचा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी शुक्रवारी केला. आपल्या ऋषी-मुनींनी निर्माण केलेले वेद सृष्टीच्या निर्मितीआधीचे आहेत. वेदांमुळेच माणूस सुसंस्कृत बनला आहे. वेदांचे ज्ञान शालेय अभ्यासक्रमात शिकवले पाहिजे,’ असेही मत त्यांनी व्यक्त केले. आपली संस्कृती सक्षम करण्यासाठी अभ्यासक्रमात अामूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.  

   
औरंगाबादेत अायाेजित अखिल भारतीय वैदिक संमेलनाच्या उद््घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते.  या वेळी त्यांनी वेद, हिंदू धर्म, युरोपीय शास्त्रज्ञांनी लावलेले शोध याविषयी वादग्रस्त विधाने केली. ते म्हणाले, ‘आज देशातून वैदिक परंपरा हद्दपार होत आहे. याला कारण इंग्रज आहेत. त्यांच्या शास्त्रज्ञांनी मांडलेले चुकीचे सिद्धांत आपण मुलांना शिकवतो.  हे पाहून वाईट वाटते. माणसाच्या उत्पत्तीविषयी  डार्विनने मांडलेला सिद्धांतच चुकीचा आहे. कारण सृष्टीच्या आधी वेदांची निर्मिती झाली, मग माणूस आला. भगवंताने वेदरूपी ज्ञान आधी दिले.’ 

बातम्या आणखी आहेत...