आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच खासगी बस भाड्याने घेऊन 23 जानेवारीपासून चालवणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मनपा शहर बस सेवा सुरू करणार आहे. मात्र, १२५ बस बस खरेदी करून त्या सुरू करण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे किमान पाच बस भाडेतत्त्वावर घेऊन त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजे २३ जानेवारीपासून चालवण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. निझामपूरकर कंपनीच्या पाच शिवनेरी बस सुरू करण्याची तयारी असल्याचे घोडेले यांनी शनिवारी सांगितले. 


सध्या एसटी महामंडळाच्या वतीने शहर बस चालवण्यात येत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातून ही सेवा मनपाला सुरू करायची आहे. त्यानुसार शहरात १२५ इलेक्ट्रिक बसेस धावतील. यासाठी निविदा प्रक्रिया राबवणे, प्रशासकीय मान्यतेसाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर २३ जानेवारीला किमान पाच बसेस खरेदी करून सुरू करण्याचे ठरले होते. मात्र, १८ जानेवारीची स्मार्ट सिटीची बैठक लांबणीवर पडल्याने बस खरेदीची प्रक्रियाही लांबली. मात्र, संकल्पपूर्तीसाठी महापौर घोडेले सरसावले असून खासगी कंपनीकडून २३ तारखेला पाच बसेस सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एसटी महामंडळात नुकतीच शिवनेरी बस दाखल झाली आहे. या बस पुरवणाऱ्या निझामपूरकर कंपनीकडूनच पाच बसेस पाच प्रमुख मार्गांवर सुरू करण्याचे नियोजन केले. यासाठी आरटीओ, एसटी महामंडळाची परवानगी घेण्यात येत आहे. या बसमध्ये ४० प्रवासी बसतील. 


एका बसला द्यावे लागेल रोज १२०० रुपये
प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येणाऱ्या पाच बससाठी संस्थेला प्रति किलोमीटर ४० रुपये दराने पैसे द्यावे लागतील. यात जीएसटी, वाहकाचा खर्च समाविष्ट करण्यात आला आहे. त्यानुसार एका बसला दरदिवशी ३०० किमीप्रमाणे १२०० रुपये ठेकेदाराला द्यावे लागणार आहेत. ३०० किमीपेक्षा कमी बस धावली तरी मनपाला दिवसाचे पूर्ण १२०० रुपये मोजावे लागतील. 


या मार्गांवर धावतील बस 
हर्सूल-रेल्वेस्टेशन ते नक्षत्रवाडी, चिकलठाणा ते नगर नाका, हर्सूल ते चिकलठाणा, नगर नाका ते वाळूज, सातारा-देवळाई ते मध्यवर्ती बसस्थानक या मार्गांवर बसेस धावतील. निझामपूरकर कंपनीच्या पुणे, मुंबईत बसेस सुरू आहेत. तिकिटाचे दर एसटी महामंडळाप्रमाणेच असतील. 

बातम्या आणखी आहेत...