आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने, पर्स चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला अटक; सव्वा लाखाचे दागिने जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दागिने आणि पर्स चोरी करणाऱ्या महिला चोरांच्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. स्नेहा मसणजोगी, पूजा मसणजोगी आणि अर्चना मसणजोगी अशी अटक करण्यात आलेल्या टोळीतील महिलांची नावे आहेत. या सगळ्या महिला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी आहेत.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवानगरी सोसायटी येथून रिक्षाने जात असताना जयश्री शिंदे या महिलेच्या बॅगेतून या आरोपी महिलांनी दागिन्यांची चोरी केली होती. त्याबाबत जवाहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत या तिन्ही महिलांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 1 लाख 16 हजार 500 रुपयांचे दागिने जप्त केले. या टोळीकडून आणखी गुन्हेही उघड होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी जवाहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...