आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तरुणीचा आहे You Tube वर बोलबाला, जातियवादाला देते आव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - तिचे वय काही फार नाही, मात्र तिच्या इच्छा- आकांक्षा आकाशाला गवसणी घालणाऱ्या आहेत. तिच्या बोलण्यात आणि आवाजात एक वेगळाच आत्मविश्वास झळकतो. ना मुलगी असल्याचा दुय्यमभाव, ना उपेक्षित कुटुंबात जन्मल्याचा कमीपणा तिला वाटतो. तिच्या गीतांमध्ये समता, न्याय आणि समाजाबद्दलच्या अभिमानाचे भाव असतात. 'फिर कि होया जे मैं धी हां' आणि 'डेंजर चमार' तिच्या या गीतांचे यू-ट्यूबवर लाखो चाहते आहेत. आपल्या गीतातून ती आपले अस्तित्व ज्या महामानवामुळे आहे त्यांचा जयजयकार करते, एवढेच नाही तर आपल्या आयुष्यातील त्यांचे महत्त्व अधोरेखित करते. ही आहे तरुण गायिका गिन्नी माही. पंजाबी गायिका गिन्नी माही 12 एप्रिल रोजी औरंगाबादेत लाइव्ह कॉन्सर्ट करणार आहे. 

 

गिन्नीच्या गावात 7 स्मशानभूमी 
- गिन्नी माही आता फर्स्ट इअरला आहे. बालपणापासूनच तिला गाण्याची आवड होती. आपल्या गीतांमधून ती आंबेडकरवाद आणि बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडते. 
- गिन्नी अशा शहरात राहाते जिथे जातियवादामुळे अवघ्या दीड किलोमीटर परिसरात सात स्मशानभूमी आहेत. या वातावरणात वाढलेली गिन्नी अभिमानाने गाणे गाते.

 

यू-ट्यूबवर प्रसिद्ध आहे गिन्नी
- सध्या यू-ट्यूबवर गिन्नीचे 'कुर्बानी देनो डरदे नहीं, रैंहदे है तैयार, हैगे असले तो वड्डे डेंजर चमार' हे गाणे धूम करत आहे. 
- मागास समाजातून आलेली आणि आपल्या गौरवचे गीत गाणारी गिन्नी काही पहिली कलाकार नाही. पंजाबात याआधी 'मुंडे चमारां दे' सारखी अनेक गीते प्रसिद्ध झाली आहेत. 
- चमकीला, राम लाल धीर, जे.एच. ताजपुरी, राज डडराल, रानी अरमान यासारख्या अनेक कलाकारांनी संत रवीदास आणि आंबेडकरी विचारधारा आपल्या गीतांमधून मांडलेली आहे.

 

बाबासाहेबांच्या विचाराने प्रभावीत
- गिन्नी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित तरुणी आहे. त्यांचे विचार समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचे काम ती आपल्या गीतांमधून करत आहे. 
- पंजाबातील म्यूझिक बँड 'चमार पॉप'साठी ती गाणी गाते. तिच्या बँडमध्ये पंजाबी लोकगीत, रॅप आणि हिप-हॉप असतात. त्यासोबतच थिरकायला लावणारे संगीत असते. 
- गिन्नीचे खरे नाव आहे गुरकंवल भारती. मात्र आता जग तिला गिन्नी नावाने ओळखते. जर तुम्ही गिन्नीची गिते अजून ऐकली नसतील, तर तुम्ही फार काही मिस केले आहे. 
- गिन्नी माही 7 वर्षांची होती तेव्हापासून गाणे गाते, वयाच्या 17 व्या वर्षी तिने पंजाबात स्वतःचा वेगळ प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. 
- फक्त पंजाबातच नाही, तर देशातील अनेक ठिकाणी गिन्नी माहीचे चाहते आहे. विदेशातही तिच्या पंजाबी गीतांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. 
- महाराष्ट्रात गिन्नी माही प्रथमच येत आहे. औरंगादमधील गिन्नी माही च्या कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश नारनवरे, संतोषकुमार दिडवाले, आनंद लोखंडे, प्रकाश नवतुरे यांनी केले आहे.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, गिन्नीचे निवडक फोटोज् आणि इन्फोग्राफिक्समधून जाणून गिन्नीचे विचार...

बातम्या आणखी आहेत...