आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांचे विचार गाण्यातून सांगणारी पंजाबी गायिका गिन्नी माही 12 एप्रिलला औरंगाबादेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाबी गायिका गिन्नी माही 12 एप्रिल रोजी औरंगाबादला येत आहे. - Divya Marathi
पंजाबी गायिका गिन्नी माही 12 एप्रिल रोजी औरंगाबादला येत आहे.

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गाण्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणारी पंजाबची तरुण गायिका गिन्नी माही येत्या12 एप्रिल रोजी औरंगाबादमध्ये येत आहे. कॅनॉट प्लेस येथे यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे पंजाबी तरुण गायिका गिन्नी माही यांचा लाइव्ह कॉन्सर्ट. याशिवाय गिन्नी माही विद्यार्थ्यांशीही संवाद साधणार आहे. 

 

असा असेल गिन्नी माही यांचा औरंगाबाद दौरा...
पंजाबी गायिका गिन्नी माही यांच्या कार्यक्रमाची माहिती सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश नारनवरे आणि संतोषकुमार दिडवाले, आनंद लोखंडे यांनी दिली. ते म्हणाले, कॅनॉट व्यापारी संघटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने 11 एप्रिल रोजी गिन्नी माही यांची वाहन रॅली आयोजित केली आहे. कॅनॉट प्लेस येथून रॅलीला सुरुवात होईल. क्रांतीचौक मार्गे वाहन रॅली मिलिंद महाविद्यालयात पोहोचेल. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन, मिलिंद महाविद्यालयाला भेट आणि त्यानंतर पीईएस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गायिका गिन्नी माही या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतील. 


12 एप्रिल रोजी लाइव्ह कॉन्सर्ट 
- डॉ. बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित गायिका गिन्नी माही यांचा लाइव्ह कॉन्सर्ट 12 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता कॅनॉट प्लेस येथे होणार आहे. 
- गिन्नी माही आपल्या गीतांमधून बाबासाहेबांचे विचार आणि प्रबोधनासोबत जातियवादावर प्रहार करतात. 
- यू-ट्यूबवर गिन्नी यांच्या 'कुर्बानी देनो डरदे नहीं, रैंहदे है तैयार, हैगे असले तो वड्डे डेंजर चमार' हे गाणे धूम करत आहे. 

- लाइव्ह कॉन्सर्टचा आनंद औरंगाबादकरांनी घ्यावा असे आवाहन जयप्रकाश नारनवरे, संतोषकुमार, दिडवाले, आनंद लोखंडे समितीचे अध्यक्ष प्रकाश नवतुरे यांनी केले आहे. Divyamarathi.Com च्या फेसबुक पेजवरही कॉन्सर्ट लाइव्ह पाहाता येणार आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये, जयप्रकाश नारनवरे यांचे आवाहन...

बातम्या आणखी आहेत...