आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - शहरात सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर जड वाहनांना बंदी आहे. मात्र, तरीही दिवसाढवळ्या या वाहनांची सर्रास घुसखोरी सुरूच आहे. गेल्या वर्षभरात या वाहनांनी शहरात १४ जणांचा बळी घेतला. डीबी स्टारने वृत्त प्रसिद्ध करताच स्वत: पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी तातडीने लक्ष घालून सर्व अधिकाऱ्यांना या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. बंदीबाबतचे चुकीच्या वेळापत्रकाचे फलकही बदलले आणि लगेच ४८ वाहनांवर कारवाई करत एक लाख रुपये दंड वसूल केला.
मात्र, हा आरंभशूरपणाच ठरला. नव्याचे नऊ दिवस ही कारवाई झाली, त्यानंतर पुन्हा पूर्वीपेक्षाही जास्त प्रमाणात शहरात या जड वाहनांची घुसखोरी सुरू झाली. बुधवार, २० डिसेंबरपासून सलग तीन दिवस डीबी स्टार चमूने पाहणी केली या वाहनांची छायाचित्रे कॅमेऱ्यात टिपली आहेत. विशेष बाब म्हणजे शहरातील विविध रस्त्यांवर चौकाचौकातून पोलिसांच्या नाकावर टिच्चून ही वाहने फिरत आहेत. मात्र, त्यांच्यावर कुणीही कारवाई करताना दिसत नाही.
शहरातील काही अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना ही बंदी लागू नाही. तरीही या वाहनांव्यतिरिक्त इतर जड वाहने शहरात फिरत असतील तर त्यांच्यावर निश्चितच कडक कारवाई केली जाईल. शिवाय याचा जाबही अधिकाऱ्यांना विचारला जाईल.
- दीपाली धाटे-घाडगे, पोलिस उपायुक्त
आमची कारवाई सुरू आहे. तरीही मी स्वत: याप्रकरणी चौकशी करतो.
- सी.डी. शेवगण, सहायकपोलिस आयुक्त, वाहतूक शाखा
पुढील स्लाइडवर पाहा, शहरात दिवसाढवळ्या सर्रास घुसखोरी करणा-या वाहनांचे फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.