आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांचे गुन्हेगारासारखे फोटो; पंचनाम्याच्या पद्धतीवर विरोधकांची संतप्त प्रतिक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वादाच्या भोवऱ्यात सापडलेली हीच ती पंचनाम्याची पध्दत. - Divya Marathi
वादाच्या भोवऱ्यात सापडलेली हीच ती पंचनाम्याची पध्दत.

उस्मानाबाद- उमरगा तालुक्यातील नुकसानीसंदर्भातील पंचनामे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पोलिस ठाण्यात गुन्हेगाराच्या हातात पाटी देऊन ज्या पद्धतीने फोटो काढले जातात त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या हातात पाटी देऊन त्यांचे फोटो काढण्यात आले आहेत.

 

 

राज्याला काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपले होते. गारपीटीमुळे विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत शेतीचे तसेच काढणी झालेल्या मालाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे सुरू असून उमरगा तालुक्यातील पंचनामे वादग्रस्त ठरले आहे. शेतकऱ्यांच्या हातात त्यांच्या नावाच्या पाट्या दिला जात असून त्यावर नुकसानाची माहिती असते. शेतात त्यांचे छायाचित्र काढले जात आहे. पोलिस ठाण्यात गुन्हेगाराचे जसे छायाचित्र काढले जातात त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचे छायाचित्र काढले जात आहे. पारदर्शक कारभारासाठी हा खटाटोप असला तरी ही पद्धत संतापजनक असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ देत आहेत.

 

 

धनंजय मुंडे यांचे ट्विट

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील ट्विटरवरुन सरकारवर टीका केली. मराठवाड्यात गारपिटीच्या नुकसानीचे अत्यंत वाईट पद्धतीने पंचनामे सुरु आहे. शेतकऱ्यांच्या गळ्यात पाटी लटकवली जाते. त्या पाटीवर शेतकऱ्याबाबत माहिती दिलेली असते.त्यावर त्याचे नाव, नुकसान लिहिलेले असते. मुख्यमंत्री महोदय, हे शेतकरी चोर आहे का? अशा पद्धतीने शेतकऱ्यांची थट्टा करणे बंद करा, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये गारपीठीने शेतकऱ्यांचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले.शेतकऱ्यांवर आस्मानी संकट आलेले असताना शेतकऱ्यांना सरकार कोणतीच भरपाई देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या वर्तमान पत्रात स्वतःच्या फोटोसह पान - पानभर जाहिराती देणाऱ्या सरकारने शिवजयंतीची एखादी शुभेच्छा जाहिरात तरी का दिली नाही ? याचे उत्तर फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावे, असे मतही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...