आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - आज रविवारी सकाळपासून मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी पावसासह प्रचंड गारपिटीला सुरुवात झाली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गारपिटीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती.
> शेताशिवार तसेच रस्त्यांवर गारांचा खच पडला. मोसंबीएवढ्या आकाराच्या गारांमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. यंदा दमदार रब्बी पिकांनी परिसरातील शिवार बहरला असताना वातावरणातील अचानक झालेल्या बदलामुळे गारपीट झाली. हातातोंडाशी आलेले पीक पुन्हा मातीत मिसळल्याने बळीराजा धास्तावला आहे.
> दरम्यान, गारपिटीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.
जीवितहानी...
> दरम्यान, जालना तालुक्यातील वंजार उमरद या गावातील नामदेव शिंदे या 70 वर्षीय शेतकऱ्याचा गारांच्या तडाख्यात मृत्यू झाला आहे.
> वाशिम येथेही गारांच्या तडाख्याने मंदिरात दर्शनाला जात असलेल्या यमुनाबाई हुंबाड या महिलेचा मृत्यू झाला असून, आनंदीबाई सरकटे या जखमी झाल्याचे वृत्त आहे.
> विभागीय आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अतुल पारगावकर यांच्याकडे जालना, अंबड, परतूर, मंठा, परभणीमधील जिंतूर येथील काही भाग या ठिकाणी गारपीट झाल्याची नोंद झाली असून उद्यापर्यंत सविस्तर अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
खबरदारीचे आवाहन
> तथापि, हवामान खात्याने कालच वादळी पावसासह गारपिटीची शक्यता व्यक्त केली होती. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात चोवीस तासांत व त्यानंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गडगडाटासह पाऊस पडणार असून गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागात पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवानी आवश्यक ती खबरदारी बाळगावी, असे सांगण्यात येत आहे.
शेतक-यांचे प्रचंड नुकसान
या गारपिटीमुळे काढणीसाठी आलेल्या ज्वारी तसेच गहू, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अंबड तालुक्यातील पिके अक्षरश: भुईसपाट झाल्याची माहिती आहे. परतूर तालुक्यातील आष्टी व इतर परिसरातही ज्वारी व गहु पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
> यंदा दमदार रब्बी पिकांनी परिसरातील शिवार बहरला असताना वातावरणातील अचानक झालेल्या बदलामुळे गारपीट झाली. हातातोंडाशी आलेले पीक पुन्हा मातीत मिसळल्याने बळीराजा धास्तावला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मराठवाडा व विदर्भात झालेल्या गारपिटीचे फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.