आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील अडीच लाखांवर शेतकऱ्यांना पैसे भरूनही मिळेना कृषिपंपांसाठी वीज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यात शेतीचे प्रश्न जटिल हाेत असल्याने शेतकरी अार्थिकदृष्ट्या अडचणीत अाले अाहेत, अात्महत्यांचे प्रमाणही वाढत अाहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कृषी क्षेत्राला सक्षम करण्याच्या वल्गना सरकारकडून केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे किमान प्रश्न साेडवण्याबाबतही सरकार उदासीन असल्याचा अनुभव वारंवार येत अाहे. राज्यातील तब्बल दोन लाख ४९ हजार ३५७ शेतकऱ्यांनी ३१ मार्चअखेरपर्यंत कोटेशन व पैसे भरूनही त्यांच्या कृषिपंपांना अद्याप वीजपुरवठा झालेला नाही. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही संख्या ६४ हजारांवर अाहे.

 

गेल्या २ वर्षांपासून काेटेशन भरूनही त्यांच्या शेतात अजून वीज पाेहाेचलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतात पाणी उपलब्ध असूनही ते पिकांपर्यंत पाेहाेचवण्यात अडचणी येत अाहेत. 
शेतकऱ्यांकडील वीज िबलाच्या थकबाकीची चर्चा एकीकडे सुरू असताना दुसरीकडे पैसे भरूनही त्यांच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. औरंगाबाद झोनअंतर्गत औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत २३ हजार ४९९ वीज कनेक्शन प्रलंबित आहेत. यामध्ये गेल्या वर्षभरात केवळ ४३२२ कनेक्शन देण्यात आले आहेत. लातूर झोनमध्ये लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत फक्त ३७८९ वीज कनेक्शन दिले असून अाणखी २४,२७३ वीज जाेडणीचे प्रस्ताव रखडलेले अाहेत.

 

नांदेड, परभणी आणि हिंगोलीमध्ये २७०७ कनेक्शन दिले असून १७ हजार ०८० प्रस्ताव प्रलंबित आहेत. मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात सर्वाधिक सिंचन असतानाही या जिल्ह्यातही ४५०५ वीज जाेडणीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, तर खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये केवळ १६२८ कनेक्शन दिले असून २० हजार ०४० प्रस्ताव प्रलंबित आहेत. 

 

कंगाल महावितरण, व्यवस्थेचा अभाव 
राज्यात सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांनी कृषिपंपांच्या विजेसाठी पैसे भरलेले अाहेत. यात  ५ एचपीसाठी ७ हजार रुपये, साडेसात एचपीसाठी ७८०० रुपये आणि दहा एचपीसाठी ९ हजार रुपये इतके पैसे कोटेशनसाठी भरले आहेत. त्यांना वीज कनेक्शन देण्यासाठी महावितरणला पोल, नवीन लाइन आवश्यक ती राेहित्रे ही व्यवस्था उभी करावी लागणार अाहे. मात्र अाधीच अार्थिकदृष्ट्या हातघाईला अालेल्या महावितरणला निधी
अभावी ही कामे करण्यात अडचणी येत अाहेत. 

 

आत्महत्या वाढताहेत,  यावर्षी तरी वीज द्या 
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे या हंगामात तरी वीज मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांना विजच मिळत नसताना बिले मात्र वाढीव पाठवली जातात.    आत्महत्या वाढत असताना यावर्षी तरी  शेतात पाणी देता येईल यासाठी वीज कनेक्शन द्यावेत. 
कैलास तवार, अध्यक्ष, मराठवाडा शेतकरी संघटना 

 

आठ दिवसांत वीज शेतकऱ्यांना मिळावी 
शेतकऱ्यांना वीज तत्काळ देण्याबाबत विचार व्हावा. पैसे भरल्यानंतर आठ दिवसांत वीज मिळाली पाहिजे अशी व्यवस्था अपेक्षित हाेते, मात्र ती होत नाही. एका वीज कनेक्शनसाठी दाेन वर्षे शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत असेल तर त्याला माेठा अार्थिक फटका बसत अाहे. 
किशोर तिवारी, अध्यक्ष, वसंतराव नाईक स्वावलंबन मिशन 

 

डीपीआर तयार करण्याचे काम सुरू 
या प्रकल्पाबाबत प्रकल्प संचालकांनी आढावा घेतला आहे. एचव्हीडीएसच्या स्कीमला मान्यताही दिली आहे. या कामास किती निधी लागेल याचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  सध्या जिथून लाइन गेलेली आहे. त्यांना सर्व्हिस वायरच्या माध्यमातून कनेक्शन देण्याचा ड्राइव्ह घेणार आहोत. 
सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, औरंगाबाद

 

वीज मिळण्यात नेमक्या अडचणी काय?

मराठवाडा आणि विदर्भासाठी आतापर्यंत दोन टप्प्यांत वीजपुरवठ्यासाठी महावितरणला निधी मिळाला आहे. 

 

पुढील स्लाईडवर पहा विदर्भातील कृषिपंपांनाही वीज जाेडणीची प्रतीक्षा...

 

बातम्या आणखी आहेत...