Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | FlashBack 2017: Kopardi rape and murder case

FlashBack 2017: सरत्या वर्षात अत्यंत महत्त्वाचा ठरला कोपर्डीचा निकाल; असा झाला न्याय!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 27, 2017, 04:14 PM IST

2017 वर्षाला निरोप देण्याची वेळ आली‍ आहे. या वर्षात अनेक गोष्टी घडल्या अन् बिघडल्याही. या सरत्या वर्षात अनेक अशा घटना सम

  • FlashBack 2017: Kopardi rape and murder case
    औरंगाबाद- 2017 वर्षाला निरोप देण्याची वेळ आली‍ आहे. या वर्षात अनेक गोष्टी घडल्या अन् बिघडल्याही. या सरत्या वर्षात अनेक अशा घटना समोर आल्या. परंतु या वर्षात अत्यंत महत्त्वाचा ठरला म्हणजे कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खून खटल्याचा निकाल. या निकालाकडे महाराष्‍ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. कोपर्डीच्या घटनेचा निषेध करण्‍यासाठी राज्‍यभरात मराठा समाजाने 'मराठा क्रांती मूक मोर्चा' काढला होता. महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात मशाली पेटवल्या होत्या.

    महाराष्ट्राचे समाजमन ढवळून काढणार्‍या कोपर्डीतील त्या घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र बाबुलाल शिंदे (25), सहआरोपी संतोष गोरख भवाळ (30) व नितीन गोपीनाथ भैलुमे (25) यांना कोर्टाने 29 नोव्हेंबर 2017 रोजी फाशीची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी विविध कलमांनुसार तपशीलवार निकालाचे वाचन करून अवघ्या पाच मिनिटांत निकाल दिला. बलात्कार व खून खटल्यात फाशीची शिक्षा होण्याचा हा सर्वात वेगवान निकाल असल्याचे या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

    घटनेच्या सव्वा वर्षांनंतर पीडितेला न्याय मिळाला. खटल्यात पीडितेची आई, बहीण व मैत्रिणीच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. शिक्षेनंतर आरोपींना बंदोबस्तात पुन्हा सबजेल कारागृहात नेले. तेथून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 18 नोव्हेंबरला कोर्टाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवले होते.

    1. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे

    > विनयभंग 3 वर्षे सक्तमजुरी, बलात्कार व कटात सहभाग - जन्मठेप, 20 हजारांचा दंड. खून केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा

    2. संतोष भवाळ
    > गुन्ह्यास प्रोत्साहन, विनयभंग
    3 वर्षे सक्तमजुरी.बलात्कारास प्रोत्साहन
    जन्मठेप, 20 हजार दंड. न भरल्यास 3 वर्ष कैद.कट सहभाग, खून, गुन्ह्यास प्रोत्साहन फाशीची शिक्षा

    3. नितीन भैलुमे

    > कट रचला, बलात्कारास प्रोत्साहन -जन्मठेप, 20 हजार दंड.
    दंड न भरल्यास 3 वर्षे साधी कैद. कटात सहभाग, खुनास प्रोत्साहन
    फाशीची शिक्षा

    छकुली... तुझी आठवण येते गं...
    अश्रूंच्या आवेगात पीडितेची आई म्हणाली, ‘छकुली... तुझी आठवण येते गं... नराधमांना फासावर लटकेपर्यंत लढाई सुरू ठेवू. यापुढे अशा घटना घडू नयेत, म्हणून कार्यरत राहीन. तसेच समाजातील इतर पीडितांवरील अत्याचाराविरुद्ध लढेन. न्यायव्यवस्था व अॅड. निकम यांच्यावर विश्वास होता. फाशीसाठी मराठा समाज एकवटला. त्यामुळेच छकुलीला न्याय मिळाला.

    परिस्थितिजन्य पुराव्यांची साखळी
    प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. परिस्थितिजन्य पुराव्यांची साखळी तयार केली. कट करणारा गुन्हा करणाऱ्याप्रमाणे दोषी असतो, असा युक्तिवाद केला. सहआरोपींना फाशीच का द्यावी, यादाखल सुप्रीम कोर्टाचे 10 न्यायनिवाडे सादर केले. त्यात इंदिरा गांधी हत्या, संसद हल्ला प्रकरणाचाही समावेश होता.
    - अॅड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील

    पुढील स्‍लाइडवा वाचा, कोपर्डीतील 'त्या' घृणास्पद प्रकाराचा घटनेचा संपूर्ण घटनाक्रम...

Trending