आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • साखरपुड्यासाठी जाणाऱ्या नवरदेवाच्या कारला अपघात, चौघांचा मृत्यु Four Killed In Car Accident Near Aurangabad

औरंगाबाद- जालना रोडवर कारच्या भीषण अपघातात भावी नवरदेवासह तीन जण ठार, दोन जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाड- साखरपुड्यासाठी जाणाऱ्या मारुती स्विफ्ट कारला भीषण अपघात होऊन भावी नवरदेवासह ४ ठार, तर २ जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सटाणा (ता. औरंगाबाद) पाटीजवळ झाला.


सर्व मृत व जखमी औरंगाबादचे रहिवासी आहेत. ते परभणीला चालले होते. मृतांत भावी नवरदेव शहजाद युनूस शेख (२३, दिल्ली गेट), तबरेज खान राजू खान (२४, कैलासनगर), मुजफ्फरोद्दीन वैजोद्दीन शेख (२६, कटकट गेट) अबुदबीन हसनबीन समेदा (२५, बायजीपुरा) यांचा समावेश आहे. 


परभणीकडे जाताना करमाड गावाजवळ अपघात 
- शहजादचा परभणीत सोमवारी सकाळी ११ वाजता साखरपुडा होता. औरंगाबादहून निघण्यासाठीच १०.३० वाजले. जास्तच उशीर होऊ नये म्हणून स्विफ्ट कार ताशी तब्बल ११० च्या वेगाने धावू लागली.
- कारचालक उमर रविवारी रात्रीच हैदराबादची ट्रिप करून रातोरात औरंगाबादला परतला होता. त्याचे रात्रभर जागरण झालेले होते. त्यातच परभणीला लवकर पाेहोचण्यासाठी सर्वांची तगमग सुरू होती.  
- कार ११० च्या वेगाने असताना चालकाला डुलकी लागली. कार दुभाजकावरून रोडच्या डाव्या बाजूला नालीत कोसळली. ती ३-४ चार वेळा उलटून शेतात घुसली. सिमेंटचे पोल कंपाउंड तोडून ती शेतात जाताच पाठीमागे बसलेले चौघे जोरात बाहेर फेकले गेले. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...