आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे यांचे खेड्यांकडे चला अभियान सुरू! स्थानिक विषयांनुसार निवडणुकीची रणनीती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद- आगामी  निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी मनसेेचे प्रमुख राज ठाकरे हे मराठवाड्यातील आजी - माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची एप्रिलमध्ये भेट घेणार आहेत.  मनसेची शहरी पक्ष अशी निर्माण झालेली ओळख मिटवण्यासाठी राज यांनी आता ग्रामीण भागात पक्ष वाढवण्याचा संकल्प केला  असल्याचे मनसेच्या सूत्रांनी सांगितले.   


राज ठाकरे २० एप्रिलनंतर मराठवाड्यामधील मनसेच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी लोकप्रतिनिधी तसेच मनसेपासून दुरावलेले परंतु अजूनही काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ते दौरा करणार आहेत.  


नुकतीच मनसेच्या औरंगाबाद शहर प्रमुखपदी सतनामसिंह गुलाटी तसेच जिल्हा प्रमुखपदी गंगापूरचे मनोज पुंडेकर यांची निवड करण्यात आली आहे. मनविसेचे प्रमुख अभिजित पानसे, सरचिटणीस तथा प्रवक्ता संदीप देशपांडे, विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमेय तिरोडकर, महिला सरचिटणीस शालिनी ठाकरे, चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर हे जिल्हा पातळीवर दौरे करत आहेत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसमधील नाराज कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांच्या भेटीही ते  घेत आहेत.  

 

स्थानिक विषयांनुसार निवडणुकीची रणनीती  
शहर व जिल्ह्यातील  प्रश्न, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या समस्या, कर्जमाफी आदी विषयांवर मनसे निदर्शने करणार आहे.  केंद्र तसेच राज्य सरकारने घेतलेली शेती, सहकारविरोधी भूमिका, जीएसटी, नोटबंदी,  मराठी युवकांसाठी नोकरी आदी विषयांवर मनसे ठोस भूमिका घेणार असून  पुढील निवडणुकीत पक्षासाठी चांगले वातावरण निर्मिती करण्यासाठी  रणनीती आखली जात असल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले.   

 

सर्व निवडणुका लढणार  
केंद्रासह राज्य सरकार  केवळ थापा मारत आहे.  युती सरकार निराशाजनक काम करत आहे. त्यामुळे आम्ही आता या सर्व गोष्टी जनतेत जाऊन सांगणार आहोत.  राज ठाकरे २० एप्रिलनंतर प्रत्यक्ष मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. यापुढे आम्ही सर्वच्या सर्व निवडणुका लढवणार आहोत.  
- अभिजित पानसे, मनविसे प्रमुख, मनसे  

 

'आता राज ठाकरे यांनी शहरी भागानंतर ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देणे सुरू केले आहे.  कर्जमाफी, कर्ज, शेतकरी, बँक, सहकार, युवक तसेच पक्ष संघटन, पक्षाची बांधणी ग्रामीण भागात करण्यासाठी कंबर कसली आहे. ठाकरेंचे चाहते महाराष्ट्रात सर्वत्र आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून ठाकरे हे युती सरकारच्या चुकीच्या निर्णय, धोरणाविरोधात युवकांमध्ये जनजागृती करणार आहेत.'

- संदीप देशपांडे, प्रवक्ता, मनसे

बातम्या आणखी आहेत...