आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • शिवसेनेने भर उन्हात क्रीडा अधिकाऱ्यांना मैदानावर पळवले, कार्यालयाला ठोकले कुलूप Shivsena Leader Action On Sports Officer In Aurangabad

शिवसेनेने भर उन्हात क्रीडा अधिकाऱ्यांना मैदानावर पळवले, उपसंचालक कार्यालयाला ठोकले कुलूप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- विभागीय क्रीडा संकुलामध्ये खेळाडूंना हॉस्टेल तसेच इतर आवश्वक सुविधा मिळत नसल्याने शिवसेनेने आज (बुधवार) आक्रमक पवित्रा घेतला. क्रीडा अधिकार्‍यांना फैलावर घेत त्यांना चक्क भर उन्हात मैदानावर पळवले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी भर उन्हात क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे आणि वॉर्डन सुनील वानखेडे यांना मैदानावर पाळायला लावले.

 

क्रीडा संकुलात आवश्यक सुविधा मिळत नसल्याच्या अनेकदा तक्रारी करूनही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत होते. मैदानावर पाण्याची न शिंपळल्याने माती उडते. त्यामुळे खेळाडूंना तोंडाला रुमाल बांधून पळावे लागते. याबाबत अंबादास दानवे यांनी अधिकार्‍यांना जाब विचारल्यानंतरही ते ऐकत नसल्याचे लक्षात येताच भुसभुशीत झालेल्या मैदानावर उपाशीपोटी खेळाडूंनी कसे पळावे, असा सवाल करत शिवसेनेने अधिकार्‍यांना भर उन्हात पळवले. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

 

खेळाडूंकडून तक्रारी आल्यानंतर अंबादान दानवे यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी क्रीडा संकुलात धाव घेतली. उपसंचालक राजकुमार महादवाड नेहमीप्रमाणे भेटले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कार्यालयाला शिवसैनिकांनी कुलूप ठोकले. तसेच क्रीडा अधिकार्‍यांना त्यांच्या कॅबिनमध्ये कोंडले. नंतर बाहेर काढून त्यांना भर उन्हात मैदानावर पळवले. 

 

डायट चार्टनुसार दिले जात नाही जेवण...

विभागीय क्रीडा संकुलाच्या कँटिनमध्ये खेळाडूंना डायट चार्टनुसार जेवण दिले जात नसल्याचे समोर आले आहे. अंबादास दानवे यांनी यांनी कॅंटिनची पाहाणी केल्यानंतर हे निदर्शनात आले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...शिवसेनेने भर उन्हात क्रीडा अधिकाऱ्यांना मैदानावर पळवल्याचे फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...