आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेटचे मुंबईला जाणारे विमान अचानक रद्द; महापाैरांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक टळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जेट एअरवेजचे मंगळवारी सकाळी मुंबईला जाणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे अचानक रद्द करावे लागले. विमानात राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसह विभागीय आयुक्त, महापौर, मनपातील अधिकारी आणि पदाधिकारी होते. विमानाचे उड्डाण अशक्य असल्याने काहींनी खासगी वाहनांनी, काहींनी पुणे मार्गे, तर काहींनी संध्याकाळच्या विमानाने मुंबई गाठली. या गडबडीत मनपा पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक मात्र बारगळली. 


जेट एअरवेजचे बोइंग ७३७-९६ एन हे विमान सकाळी मुंबईहून पहाटे ६.२१ वाजता औरंगाबाद विमानतळावर आले. विमानाचा परत मुंबई प्रवासासाठीचा उड्डाणाचा वेळ सकाळी ६.५० चा होता, तर ७.४५ वाजता ते मुंबईत पोहोचणार होते. उड्डाणाआधी विमान काही अंतर धावपट्टीवर धावते. या प्रक्रियेला टॅक्सी आऊट असे म्हणतात. यासाठी कॅप्टनला सिग्नलही मिळाला. मात्र, काही क्षणांतच वैमानिकाला विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे जाणवले. त्याने लगेच विमानतळावरील इंजिनिअरिंग विभागाला याची माहिती दिली. इंजिनिअरिंग विभागाने धाव घेऊन बिघाड दुरुस्त करता येण्याजोगा आहे की नाही याची पाहणी केली. मात्र, तो लगेच दुरूस्त होऊ शकत नसल्याचे लक्षात आल्याने वैमानिकाने विमान उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...