आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिटमिट्यात कडकडीत बंद, देवळाईकरही इरेला पेटले!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारच्या पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ पडेगाव-मिटमिटा परिसरातील नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. नागरिकांनी गुरुवारपासून साखळी उपोषण सुरू केले. अप्पावाडी भागात  कचरा टाकण्यासाठी गेलेली वाहने अडवून नागरिकांनी तुफान दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांच्या या कारवाईचा निषेध म्हणून नागरिकांनी गुरुवारी कडकडीत बंद पाळला. या बंदमध्ये मिटमिटा, पडेगाव, सैनिक कॉलनी, चिनार गार्डन, कासलीवाल तारांगण, अर्चअंगण, पोलिस कॉलनी, प्रिया कॉलनी, सुंदरनगर आदी भागांतील दुकानदार, व्यापारी सहभागी झाले होते. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईचा निषेध म्हणून कासलीवाल तारांगण- मिटमिटा कृती समितीच्या वतीने तारांगण फाटा येथे उपोषण सुरू केले.


१२०० पेक्षा अधिक जणांवर गुन्हे

मिटमिटा परिसरात बुधवारी झालेल्या दगडफेक प्रकरणात छावणी ठाण्यात पोलिस व मनपा प्रशासनाच्या फिर्यादीवरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांच्या वतीने उपनिरीक्षक सचिन मिरधे यांच्या फिर्यादीवरून कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न करणे) तसेच इतर विविध कलमांतर्गत १२०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, तर मनपाचे उपअभियंता देविदास पंडित यांच्या तक्रारीवरून कलम ३५३ (शासकीय कामात अडथळा) अंतर्गत ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.    


३७ अधिकारी, कर्मचारी जखमी, सहा वाहनांचे नुकसान  : दगडफेकीत ११ अधिकारी, २४ पोलिस कर्मचारी जखमी झाले. तसेच पोलिसांच्या व मनपाच्या प्रत्येकी तीन वाहनांचे नुकसान झाले.  बुधवारी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी २४ जणांना, तर शासकीय कामात अडथळाप्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिली. 

   
पोलिसांनी नुकसान केल्याचा आरोप: धुमश्चक्रीदरम्यान पोलिसांनी नागरिकांच्या घरावर दगडफेक केली. अनेक घरांत घुसून टीव्ही व इतर सामानाचे नुकसान केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. गुरुवारी या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

   
दहावीच्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले :
ताब्यात घेतलेल्यांमध्ये दहावीचे विद्यार्थी असल्याची चर्चा परिसरात होती. मनपाच्याच शाळेतील हे विद्यार्थी असल्याचे समोर आले. परंतु याचे उपायुक्त ढाकणे यांनी खंडन केले.    


राजकीय पुढाऱ्यांची लागली रीघ : बुधवारच्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर भाजप, शिवसेनेच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी मिटमिटा, पडेगावच्या नागरिकांच्या भेटी घेण्यासाठी रीघ लावली होती. सायंकाळी आठ वाजता खासदार चंद्रकांत खैरे यांनीदेखील भेट दिली.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, देवळाईकरही इरेला पेटले...

बातम्या आणखी आहेत...