आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून ओढले केस, तरूणाने शिवीगाळ करून दिली बलात्काराची धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचे केस ओढून बलात्काराची धमकी देणाऱ्या शुभम भाऊसाहेब बागुल यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. 


हडको परिसरातील १४ वर्षीय मुलगी १५ नोव्हेंबर २०१५ रोजी दळण ठेवून घरी परत जाताना त्याच भागात राहणारा शुभम भाऊसाहेब बागुल या माथेफिरू तरुणाने त्या मुलीस आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मुलीने त्याकडे दुर्लक्ष करून ती घरी लवकर लवकर जाताना तो पळत आला आणि तिच्या डोक्याचे केस ओढून तिला बलात्काराची धमकी देत शिवीगाळ करून मारहाण केली. पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांच्यासमोर झाली असता सहायक लोकअभियोक्ता अजित अंकुश यांनी सहा साक्षीदार तपासले. 

बातम्या आणखी आहेत...