आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत एकनाथ, भानुदासाच्या जयघोषाने पैठण नगरी दुमदुमली, कालाहंडी फोडून नाथषष्ठीची सांगता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण (औरंगाबाद) - पैठण येथे सुरु झालेल्या संत एकनाथ षष्ठी सोहळ्याची आज सूर्यास्ताच्या समयी नाथसमाधी मंदिराच्या गाभाऱ्यात कालाष्टमीची दहीहंडी फोडून सांगता झाली. संत एकनाथ, संत भानुदास यांच्या वैष्णवांनी केलेल्या जयघोषात शुक्रवार सायंकाळी फक्त मंदिर परिसर नाही तर पैठण नगरी दुमदुमली होती. 

 

एकनाथांच्या वंशजांनी फोडली हंडी
नाथवंशज रावसाहेब महाराज यांच्याहस्ते नाथमंदिराच्या प्रांगणात कालाहंडी फोडण्यात आली.  त्याआधी रघुनाथबुवा महाराज गोसावी, तळेगावकर, पैठणकर, योगीराज महाराज गोसावी, रावसाहेब गोसावी  यांच्या पालखींचे आगमन झाले. पालखीच्या आगमनानंतर दहीहंडी फोडण्यात आली.

 

भाविकांनी खेळी पावली

भाविकांनी पावली खेळून आनंद व्यक्त करत भानुदास, एकनाथ महाराजांचा जयजयकार केला.
मंदिर परिसरात काला उत्सवात सहभागी होण्यासाठी आबाल वृद्धांसह, महिला भाविकांनी गर्दी केली होती. विविध भागातून आलेल्या भाविकांसह यावेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार संदीपान भुमरे, जिल्हा परिषद सभापती विलास भुमरे,  नगराध्यक्ष सुरज लोळगे, रघुनाथ महाराज, योगीराज महाराज, सरदार महाराज गोसावी, हरिपंडित महाराज गोसावी, मेघश्याम महाराज गोसावी यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व इतर  मान्यवर उपस्थित होते.
वारकरी संप्रदाय व नाथभक्तांच्या या सोहळ्याप्रसंगी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मागील तीन दिवसांपासून नाथषष्ठी उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्य भरातून वैष्णव भक्त पैठण नगरीत दाखल झाले होते. कालाष्टमीचा प्रसाद घेऊन नाथ भक्तांनी आपला परतीचा प्रवास सुरू केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...