आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेणखताच्या ट्रॅक्टरवर आदळल्याने कंटेनरचा वेग मंदावला; 2 दिवसांत जिल्ह्यात दुसरी माेठी घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद/ करमाड- नेहमीप्रमाणे करमाडचा आठवडी बाजार सकाळी भरण्यास सुरुवात झाली होती. गावातील मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी जागा कमी असल्याने काही टरबूज विक्रेते आणि कापूस मोजणी यंत्रावर जाणारे विक्रेत्यांनी गावाच्या प्रवेश होतो तेथेच छोटा बाजार मांडला होता. एकीकडे रसवंतीवर रस पिण्यासाठी काही ग्रामस्थ थांबलेले होते तर दुसरीकडे किरकोळ व्यावसायिक आप आपल्या रिक्षामध्ये टरबूज भरून घेत होते. बारा वाजेपर्यंत अर्धाअधिक टेम्पो खाली होत होता एक बारा चाकी कंटेनर (एमएच-४३-वाय-२२६५) बाजारावर येऊन आदळला. टायर तुटण्यापासून ते कंटेनर आदळण्यापर्यंत एखादा बॉम्बस्फोट व्हावा तसा आवाज झाला आणि लोकांच्या किंचाळल्याने परिसरातील ग्रामस्थांचे क्षणभर कान सुन्न झाले. 


करमाडमध्ये नेहमीप्रमाणे भरलेला बाजार सोमवारी मात्र भरलाच नाही. गावाच्या अलीकडेच कंटेनरने रस्त्याच्या कडेला बाजार मांडलेल्या सतरा जणांना गंभीर जखमी केले.  घटनेपूर्वी कंटेनरच्या चाकाला मार लागल्याने कंटेनरचे टायर फुटले असल्याची शंका टायर विक्रेत्यांनी व्यक्त केली अाहे. कंटेरनखाली टरबुजांचा झालेला चुराडा आणि जखमींचे रक्त एकत्र झाले होते. दरम्यान पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, वाहतूक विभागाचे निरीक्षक भगवान फुंदे  यांनी  घटनास्थळी भेट दिली.  सिंह यांनी फरार चालकाचा शोध घेण्याचे आदेश दिले. जखमींचे जवाब नोंदवण्याचे काम उपनिरीक्षक शरद रोडगे हे करत होते. 

 

शेणखताचा ट्रक आणि लिंबाचे झाड  
कंटेरनचे टायर फुटले तसे चालकाचा ताबा सुटला आणि ताे डाव्या दिशेला घुसला. यावेळी त्याच्या त्याच बाजूने एक शेणखत वाहून नेणारे ट्रॅक्टर (एमएच-२०-ईजी-४९९४) होते. त्या आधी समोर असलेल्या पाच दुचाकीस्वारांना त्याने उडवले. त्यानंतर ट्रॅक्टर ला धडक दिली. कंटेनरवर रस्ता तयार करण्याचे अवजड यंत्र असल्याने कंटेनरची ट्रॉली थेट समाेरील रसवंतीवर जाऊन आदळली. यात दुचाकी व अॅपे रिक्षांचे माेठे नुकसान झाले. 

 

मृत्यू समोरून गेला  
कंटेनर ट्रॅक्टर आणि इतर वाहनांना धडकून आत घुसला. कापूस विक्रीसाठी बाजारात आलेले गजानन बन्सी बताडे (रा. दायगव्हाण) त्यांच्या कापूस असलेल्या अॅपेरिक्षा (एमएच-२०-ईजी-०५००)सह उभे होते. रिक्षा दुसऱ्या बाजूला उभा होता. कंटेनर रसवंती यंत्रासमोर जाऊन थांबला आणि तेथे बताडे बालंबाल बचावले.  

 

हे आहेत जखमी

एमआयटी रुग्णालयात उपचार घेत असलेले मधुकर बंडू रनभरे (६५, रा. टोणगाव) यांची प्रकृती चिंताजनक

 

धुत रुग्णालयातील अतिदक्षता विभाग

- सतीश पुंडलिक आहेर (३०, रा. टोणगाव)

- दिगंबर शंकर हजारे (५५, रा. आपतगाव)

- मधुकर देवराव हजारे (रा. आपतगाव)

 

घाटी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग

- सुनील विठ्ठल डांगे (३०, रा. भालगाव)

- नामदेव भागाजी रनभरे (६४, रा. टोणगाव)

- काकासाहेब भावराव जाधव (६०, रा. टोणगाव)

- सचिन राजू खरात (२५, रा. पिंप्रीराजा) यांच्या हाताला, डोळ्याला, पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे.

 

धुत रुग्णालयातील इतर :

- ज्ञानेश्वर प्रभाकर सरोदे (२६, रा. टोणगाव)

- ज्ञानेश्वर गंगाधर डांगे (३५, रा. भालगाव)

-बागवान रहीबर ताहेर (१६, रा. लाडसावंगी)

-कापूस विक्रेता कुंडलिक विश्वनाथ आहेर (७०, रा. टोणगाव)

- टरबूज विक्रेता जाकीर शब्बीर शफी अहमद बागवान (३५) - शब्बीर शफी अहमद (३०)

- शेख सलीम रशीद बागवान (३२, तिघेही रा. लाडसावंगी)

श्रद्धा हॉस्पिटल : तुकाराम सरोदे (रा. टोणगाव) आणि संदीप व्यवहारे. 

 

बातम्या आणखी आहेत...