आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पट्ट्यांचे लिलाव होत नसल्याने वाळू 3 वर्षांत दुपटीने महागली; एकाच पट्ट्यातून उपसा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औैरंगाबाद - मराठवाड्यात वाळूपट्ट्याचे लिलाव होत नसल्याने तीन वर्षांपूर्वी ३ हजार रुपये ब्रास मिळणारी वाळू सध्या सहा ते सात हजार रुपये ब्रास इतक्या दराने खरेदी करावी लागत आहे.
मराठवाड्यात यावर्षी ३३४ पैकी केवळ १०५ वाळुपट्याचे लिलाव झाले. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ३८ आणि जालना जिल्ह्यात २६ वाळुपट्याचे लिलाव झाले आहेत. तर  उस्मानाबाद १२ आणि परभणी जिल्ह्यात १० वाळुपट्याचे लिलाव झाले आहेत.


लिलावाचा बोजवारा : औरंगाबाद जिल्ह्यात ३१ वाळुपट्टे लिलावासाठी ठेवण्यात आले होते. त्यासाठी दोन वेळा लिलाव प्रक्रिया झाली. त्यात सात पट्ट्यंाचे लिलाव झालेे. त्यानंतर हरित लवादाने सर्वच जिल्ह्यांना उपसा आराखडा (मायनिंग प्लॅन) सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. प्रत्येक जिल्ह्यात सल्लागार नेमून आराखडा करावा, असे म्हटले होते.  मात्र,  एप्रिल महिना संपत आला आराखडे तयार झाले नसल्याने लिलाव झालेले नाहीत.


केवळ ६८ कोटींचा महसूल : मराठवाड्यात वाळुपट्टे लिलावातून २०१७-२०१८ मध्ये १७४ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असतांना केवळ ६८ कोटी रुपये मिळाले. नांदेड जिल्ह्यात ३१ कोटी ८१, जालना १३ कोटी ९१ तर परभणी जिल्हात १४ कोटी ०२,  उस्मानाबाद जिल्ह्यातून ३ कोटी ६० लाखा रुपये शासनाला मिळाले. 


दंडातून १४ कोटी : मराठवाड्यात गेल्या वर्षभरात ४२८८  अवैध वाळू उपश्याचे प्रकार समोर आले. त्यात  १४  कोटी ३५ लाख रुपये दंडापोटी वसूल झाले. औरंगाबाद जिल्ह्यात ३६६ प्रकरणात  १ कोटी ३५  लाखांची वसुली होऊन े १५ जणावर गुन्हे दाखल झाले आहेत. तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ९५५ प्रकरणात  दोन कोटी ८३  लाख,लातूर १०४६ प्रकरणात१ कोटी ८३ लाख बीड ४९८ प्रकरणात २ कोटी ६७ लाख रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.तर जालना ३६१ प्रकरणात १ कोटी ९ लाख आणि परभणी  जिल्ह्यात ५१४ प्रकरणात दोन कोटी सात लाख वसुल करण्यात आले आहेत. मराठवाड्यात १९६ गुन्हे दाखल झाले आहेत.
जळगाववरुन येते औरंगाबादला वाळु : औरंगाबादमध्ये सध्या तापीची वाळु येत आहे.जळगावमध्ये वाळुचे दर स्वस्त असून तीन ते चार हजार रुपयापर्यत प्रतिब्रास वाळु मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणावरुन औरंगाबादला वाळु येत आहे. तसेच जालना जिल्ह्यात वाळुपट्याचे लिलाव झाल्यामुळे इथूनही वाळु येत आहे. याशिवाय महसुल आणि पोलीसांच्या देखत राजरोस वाळुचा अवैध उपसा सुरुच आहे.

 

मायनिंग प्लॅननंतर लिलाव होणार
दोन वेळा वाळुपट्याचे लिलाव झाले होते. यामध्ये सात वाळुपट्टे गेले होते.मात्र त्यानंतर हरित लवादाच्या निर्णयामुळे ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. सध्या कन्सलटंट नेमला असून मायनीग प्लॅन सादर झाल्यानंतर वाळुपट्याचे लिलाव होतील.
पी.एल.सोरमारे,अप्पर जिल्हाधिकारी औरंगाबाद

 

पैसे देऊनही वाळू मिळणे अवघड
काहीवेळा आठ हजार रुपये ब्रासने वाळू खरेदी करावी लागतआहे.  तीन हजार रुपये दराने वाळु मिळाल्यास त्याचा फायदा नागरिकांनाच होणार आहे.  घराच्या किमती किमान तीन ते पाच टक्याने कमी होवू शकतात.
पापालाल गोयल,माजी अध्यक्ष क्रेडाई

 

लिलाव नसल्याने मिळत नाही वाळू

औरंगाबाद जिल्ह्यात वाळुच नसल्यामुळे तीन वर्षापू्वी आम्ही तीन हजार रुपये ब्रासने देत असलेली वाळू सहा हजारांनी देत आहोत. हर्सुल तलावात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे. त्यावरही कारवाई झाली पाहिजे. 
अश्फाक पटेल, जिल्हाध्यक्ष वाळुवाहतुकदार संघटना

 

बातम्या आणखी आहेत...