आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारेगावच्या अांदोलकांना पोलिस बळाची धमकी देणारे प्रशासन मुख्यमंत्र्याच्या फोननंतर थंडावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नारेगावात कचरा टाकू देणार नाही, या भूमिकेवर तेथील ग्रामस्थ ठाम असल्याचे लक्षात आल्यावर त्यांना पोलिस बळाच्या वापराची धमकी देण्यापर्यंत मनपा, जिल्हा प्रशासनाने मजल गाठली. त्यावर ग्रामस्थांनीही तुम्ही बळाचा वापर केला तर आम्ही धर्मा पाटील होण्यास तयार आहोत, असे प्रत्युत्तर दिले. रात्री उशिरा चिकलठाणा पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदवली. नारेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गुरूवारी परिसरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. बुधवारी महापालिकेने वाळूज जवळ खंडेवाडी शिवारात कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. तो तेथील ग्रामस्थांनी हाणून पाडला. दरम्यान, परिस्थिती संयमाने हाताळा, अशी स्पष्ट सूचना मुख्यमंत्री कार्यालयातून आल्याने महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी बंदोबस्तात कचरा टाकण्यापूर्वी सकाळी ११ वाजता पुन्हा बैठक घेण्याचे ठरवले आहे. 


बाभूळगाव, खंडेवाडी येथे कचरा टाकण्यात अपयश आल्यावर मनपासमोरील सर्व पर्याय संपले. मग जिल्हाधिकारी एन. के. राम, महापौर नंदकुमार घोडेले, मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांच्या उपस्थितीत सायंकाळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यासोबत बैठक झाली. त्यात आता नारेगावकरांच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय पर्याय नसण्यावर एकमत झाले. 


तुम्ही राजी नसाल तर...
त्यानुसार मनपा आयुक्तांचे लेखी आश्वासन असलेले पत्र घेऊन अधिकारी नारेगावला गेले. तेथे चर्चेत बिनसले अन् नव्या वादाचा जन्म झाला. 'तुम्ही राजी नसाल तरी आम्ही पोलिसांच्या बंदोबस्तात येथे कचरा टाकू,' असे प्रशासनाच्या शिष्टमंडळाने सांगितले अन् त्यावर 'आम्हाला धमकी देऊ नका, तुम्ही बळाचा वापर केला तर आम्ही काहीही करू. येथील शेतकरी धर्मा पाटील होण्यास सज्ज आहेत,' असे प्रत्युत्तर देण्यात आले. प्रशासनाचे शिष्टमंडळ तेथून परतताच आंदोलकांनी थेट चिकलठाणा पोलिस ठाणे गाठून आम्हाला धमकी देण्यात आली, अशी तक्रारही दिली.

 
आमदार सावे तापाने फणफणले 
कचराकोंडीचा फटका भाजप आमदार अतुल सावे यांना बसला. त्यांना दुर्गंधीची बाधा झाली. ते तीन दिवसांपासून खोकला, तापाने फणफणले आहेत. कचराकोंडी फोडण्यासाठी तुम्ही मागे का, असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, मीच तापाने फणफणलोय, आज थोडे बरे वाटतेय. काहीही करून कचराकोंडी फुटली पाहिजे म्हणून गुरुवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची आपण भेट घेणार आहोत. 


आमदार इम्तियाज म्हणाले, ही तर सत्ताधाऱ्यांच्या पापांची फळे 
कचराकोंडी ही गेल्या २८ वर्षांपासून महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेना व भाजपच्या पापाची फळे असल्याची टीका एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली. ते म्हणाले, कचऱ्याचा प्रकल्प उभारण्यापेक्षा मला काय मिळेल याचाच विचार या लोकांनी केला आहे. चीनला पदाधिकारी खरेच कशासाठी गेले याचे उत्तर त्यांनी अजूनही जनतेला दिले नाही. म्हणून जनतेनेच त्यांना जाब विचारावा. 


मेडिकल असोसिएशनची मदत 
दरम्यान, साचलेल्या कचऱ्यामुळे पसरलेल्या दुर्गंधीनंतर पसरणाऱ्या रोगराईवर मात करण्यासाठी महापौरांनी बुधवारीही प्रयत्न केले. महापालिकेची आरोग्य सेवा कमी पडल्यास काय, असा प्रश्न होताच. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांना पाचारण करून परिस्थिती उद््भवल्यास मदत करण्याची मागणी केली. असोसिएशनचे अध्यक्ष कुलदीपसिंग राहूळ, डॉ. प्रदीप बेंजरगे यांनी संघटनेच्या वतीने शहरातील ४७५ रुग्णालये नागरिकांच्या आरोग्यासाठी उपलब्ध होतील, अशी ग्वाही दिली. दुर्गंधीमुळे बाधित रुग्ण महापालिकेने पाठवले किंवा शहरातील रुग्ण तसेही रुग्णालयात आले तरी आम्ही त्यांच्यावर उपचार करू, असे आश्वासन दिले. 


कचरा अभ्यासाच्या नावाखाली सहली 
कचरा प्रक्रिया अभ्यासाच्या नावाखाली अनेकांनी विदेशातील सहलीची मौज केली. त्यातून काय निष्पन्न झाले याचा हिशेब देणे तर दूरच, पुढेही काही काम झालेले नाही. ज्या वसाहतींमध्ये कचरा पडून आहे त्यामुळे साथीचे रोग फैलावणार नाही याची हमी मनपा घेणार आहे का, असा सवाल आमदार सतीश चव्हाण यांनी केला आहे. 


चालकांनीच टँकर विकल्याची... 
या विश्वासातूनच त्यांनी त्यांच्याकडील दोन टँकर टक्केवारीच्या तत्त्वावर या दोघांना चालवायला दिले. सुरुवातीला झालेल्या व्यवहाराची नोंदही त्यांनी केली, परंतु नोव्हेंबर, २०१७ पासून दोघेही टँकरसह बेपत्ता झाले. सैय्यद यांनी कॉल केला असता टँकर विकले असून काहीच मिळणार नाही, अशी धमकी दोघांनी दिली. त्यानंतर सैय्यद यांनी सातारा पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार कैसर शेख करत आहेत.

 
सावंगीतील परीक्षा केंद्रात कॉपीसाठी मोकळे रान... 
आत गेले तरी पालकांनी मात्र पूर्ण तीन तास परीक्षा केंद्राभोवती ठाण मांडले होते. काही जण तर अक्षरशः कुंपणाजवळच होते. विशेष म्हणजे या परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त होता, परंतु हे पोलिस केवळ समोरील बाजूस बसलेले होते. हे पोलिस अधिकारी विद्यालयाच्या मागील बाजूस फिरकलेही नाहीत. विशेष बाब म्हणजे विद्यालयाच्या मागील बाजूच्या भिंतीजवळच जिना आहे. पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने सारखे आत ये जा बाहेर ये या जिन्यावरून सुरू असल्याचे दिसून आले. 


पहिल्या दिवशीच सात कॉपीबहाद्दर
विभागात बारावीच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला एकूण सात विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळले. त्यात एक विद्यार्थी औरंगाबाद जिल्ह्यातील असून इतर सात विद्यार्थी बीड जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाने दिली. 


सभासदांना अंधारात ठेऊन... 
विठ्ठल सूर्यवंशी, मिलिंद कासारे, प्रमोद पाल यांच्यावर सिडको ठाण्यात गुन्हा दाखल असून दोन संशयितांना अटक झाली आहे. एकाला जामीन मिळाला असून एकजण अजूनही हर्सूल कारागृहात असल्याचे सभासदांनी सांगितले. या प्रकरणी कारवाई व्हावी, जमीन सील करावी, अशी मागणी सभासदांनी पोलिस आयुक्तांकडे केली. राम उदावंत, राहुल खरात, रवींद्र बागूल, दत्ता शैलार, समाधान बावस्कर, साईनाथ दांडगे, संदीप खरात यांची उपस्थिती होती. 


मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना 
मुख्यमंत्री कार्यालयातून वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याला फोनवरून आंदोलन संयमाने हाताळण्याची सूचना करण्यात आली. आंदोलकांवर लाठीमार, पाण्याचा मारा करू नका. त्यांनी दगडफेक केली तरी बळाचा अतिरेकी वापर नको, असे बजावण्यात आले. 

 


महापौरांची सारवासारव : लगेच पोलिस येतील, असे नाही 
महापौर म्हणाले की, गुरुवारी सकाळी आम्ही तेथे कचऱ्याच्या गाड्या नेणार नाहीच. सकाळी ११ वाजता पुन्हा एकदा विभागीय आयुक्तांकडे बैठक होईल. त्यानंतर निर्णय घेऊ. नारेगावकरांची भूमिका योग्य आहे, परंतु १५ लाख लोकसंख्येचा विचार करून त्यांनी थोडा अवधी द्यावा, अशीच विनंती आहे. एखादा अधिकारी काही बोलला म्हणजे लगेच पोलिस येतील असे होणार नाही. आंदोलन करणारे आपलेच आहेत. त्यामुळे काही जण प्रकरण चिघळवण्याचा प्रयत्न करताहेत त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. 

 

या गोष्टी करा, दुर्गंधीच्या बाधेपासून दूर राहा 
- भाज्या, फळे स्वच्छ धुऊन घ्या. 
- अन्न गरम खाणे कधीही चांगले. दोन तासांनंतरचे अन्न शक्यतो टाळावे. 
- अन्न कायम झाकून ठेवा. त्यावर माशा बसणार नाहीत,याची काळजी घ्या. 
- काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. 

 

काय म्हटले आहे तक्रारीत ? 
चिकलठाणा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नारेगाव, गोपाळपूर, मांडकी, महालपिंप्री, वरूडच्या आंदोलकांनी तक्रार दिली.उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार सतीश सोनी, रमेश मुनलोड यांनी आम्हाला 'वाटाघाटी करा नाहीतर पोलिस बळाचा वापर करू, गुन्हे दाखल करू' असे धमकावले. त्याचे व्हिडिओ शूटिंग केले. ही हुकूमशाही असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, असे या तक्रारीत म्हटले आहे. विश्वनाथ चौथे, अकबर शहा, रामेश्वर लाटे, दिलावर बेग, सतीश अंभोरे, कुसुमबाई झंझाडे, साेमीनाथ दांडगे यांच्यासह पंचक्रोशीतील १०० ग्रामस्थांनी हे तक्रारवजा निवेदन दिले आहे. 


आम्ही फक्त समजावले 
दरम्यान, शहराची परिस्थिती काय आहे तसेच मनपाने आतापर्यंत काय केले आहे हे माझ्यासह दोन तहसीलदारांनी आंदोलकांना सांगितले. कचरा साठल्याने रोगराई पसरण्याची भीती असल्याने प्रशासनाकडून बळाचा वापर करण्यात येईल, असा इशारा दिला. धमकावले नाही, असे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल म्हणाले. 


१ लाख मास्क, बायो ट्रीट प्राप्त 
कचऱ्यावरील दुर्गंधी दूर करणारे बायो ट्रीट हे रसायन औरंगाबादला आले. दुसरीकडे दुर्गंधीपासून बचावासाठी नागरिकांना २ लाख मास्क देण्याचा निर्णय मनपाने घेतला होता. त्यातील १ लाख मास्कही आले असून ते गुरुवारपासून वाटले जाणार आहेत. 


खंडेवाडीतही मनपाच्या प्रयत्नांचा 'कचरा'च! 
खासगी व्यक्तीसोबत करार करून बुधवारपासून वाळूज शिवारात कचरा टाकण्याचा निर्णय घेतला. रात्रीपर्यंत याची खबर कोणालाही नव्हती. मात्र वाळूज लगतच्या खंडेवाडी या गावातील नागरिकांना सकाळी हा प्रकार समजताच त्यांनी आलेल्या मोटारी रोखल्या. ग्रामस्थ येईपर्यंत २० ट्रक येथे खोदलेल्या चरांमध्ये ओतल्या होत्या. मात्र नंतरच्या १० ट्रक त्यांनी ट्रक रोखल्या. जीव गेला तरी चालेल, पण येथे कचरा टाकू देणार नाही, अशी भूमिका सर्वांनी घेतली. यात तरुणांचा मोठा भरणा होता. येथे कचरा डेपो झाला तर माझे लग्न होणार नाही, असे सांगत येथील प्रवीण गरड हा तरुण वाहनासमोर उडी घेण्यास तयार झाला. पोलिसांनीही प्रयत्न करून पाहिला, पण उपयोग झाला नाही. त्यानंतर आयुक्त मुगळीकर हे तेथे पोहोचले. त्यांनी सरपंच अशोक ढगे यांच्यासह ग्रामस्थांशी चर्चा केली. शहरातील १५ लाख लोकांचा प्रश्न आहे. तेव्हा काही दिवसांचा वेळ द्या, अशी विनवणी त्यांना केली. परंतु ग्रामस्थ ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. आम्हाला चर्चाच करायची नाही. जर तुम्ही वाहने चालवणारच असाल तर आम्हाला अन्य मार्गाने जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. 


गुपचूप पोहोचवले कचऱ्याचे ट्रक 
येथे कचरा टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर येथील ग्रामस्थांशी चर्चा करणे अपेक्षित होते. परंतु विरोध होणार असे गृहीत धरून आधीच निश्चित केलेल्या जागेवर रात्री गुपचूप चर खोदण्यात आला. सकाळी अचानक गाड्या येथे पोहोचल्या. गावकऱ्यांना खबर लागल्यानंतर ते येथे पोहोचेपर्यंत ३० ट्रकमधील कचरा चरमध्ये टाकण्यात आला होता. १० गाड्यांतील कचरा टाकू दिला गेला नाही आणि आंदोलकांनी कोणतेही नियोजन, विश्वास नसलेला निर्णय फिरवण्यास महापालिकेला भाग पाडले. 

बातम्या आणखी आहेत...