आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिटमिटा मारहाण प्रकरण: आता परत येण्यात रस नाही- पोलिस आयुक्त यशस्वी यादव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस आयुक्त यशस्वी यादव आयुक्तालयातून बाहेर पडताना. - Divya Marathi
पोलिस आयुक्त यशस्वी यादव आयुक्तालयातून बाहेर पडताना.

मुंबई- सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले पोलिस आयुक्त यादव यांनी आता औरंगाबादेत परत येण्यात रस नसल्याचे संकेत पत्रकारांशी बोलताना दिले. दरम्यान, मिलिंद भारंबे यांनी गुरुवारी रात्री शहर पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. हा कार्यभार स्विकारत असताना यशस्वी यादव मात्र अनुपस्थित होते.

 

दोन्ही आयुक्तांना हटवा
राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी आंदोलकांवरील लाठीमार ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असल्याचे सांगत पोलिस व महापालिका आयुक्तांना पदावरून दूर करावे, अशी मागणी सभागृहात केली.

 

परदेश वाऱ्याही अडचणीत
कचरा प्रश्नावर विदेशात अभ्यास सहलीवर गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी लक्षात घेत तशी तयारी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दर्शवली. चर्चेत संजय शिरसाट, राजेश क्षीरसागर, अतुल सावे यांनीही मुद्दे मांडले.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...