आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर विवाहितेचे फाेटाे टाकून बदनामी; सोशल मीडियावरील छेडछाडीची चौथी घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- उच्चशिक्षित विवाहितेचे एडिट केलेले छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. बेगमपुरा पोलिस आणि सायबर विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे, असे निरीक्षक राजश्री आडे यांनी सांगितले. दरम्यान, सोशल मीडियावर महिलांची छायाचित्रे पोस्ट करून बदनामी करण्याचा महिनाभरात समोर आलेली ही चौथी घटना आहे. 


बेगमपुरा भागातील या विवाहितेचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला. ती सुशिक्षित कुटुंबातील असून खासगी नोकरी करते. तिची काही छायाचित्रे फेसबुकवर व्हायरल झाल्याचे दोन दिवसांपूर्वी तिला समजले. विशेष म्हणजे आरोपीने विवाहाची काही छायाचित्रे मिळवून तीही पोस्ट केली होती. आरोपीने महिलेच्याच नावे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून त्याद्वारेच ही छायाचित्रे पोस्ट केली. 


१३ फेब्रुवारी रोजी रात्री बेगमपुरा पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अज्ञात आरोपी विरोधात आयपीसी ३५४ आणि ६६ सी, ६६ ई या आयटी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


चौथी घटना : काही दिवसांत सोशल मीडियावर महिलांसंदर्भात अश्लील पोस्ट टाकण्याचे चार ते पाच प्रकार समोर आले आहेत. दोन प्रकरणात सायबर विभागाने आरोपींना अटक केली आहे. एमआयडीसी सिडको, वेदांतनगर व पुंडलिकनगर भागातील महिला, तरुणींसोबत हा प्रकार घडला होता.

बातम्या आणखी आहेत...