आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटणादेवी जंगलात सौरऊर्जेवरील पंप लावून प्राण्यांची तहान भागवली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- अाैरंगाबाद व जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरील पाटणादेवी जंगलात १८ नैसर्गिक, तर ३६ कृत्रिम पाणवठे अाहेत. यंदा उन्हाळ्यात ते काेरडेठाक असल्याने वन्यप्राण्यांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ अाली अाहे. काही ठिकाणी टँकरने पाणवठ्यात पाणीपुरवठा सुरू अाहे. ज्या ठिकाणी टँकर पाेहाेचू शकत नाही, अशा तीन ठिकाणी कूपनलिका करून साैरऊर्जेवरील पंप टाकून पाण्याची व्यवस्था करण्यात अाली अाहे.   


पाटणादेवी अभयारण्याचे क्षेत्र सहा हजार हेक्टर अाहे. सात बिबटे, शेकडाे नीलगायी, रानडुकरे, ससे, हरीण, काळवीट अशा नानाविध वन्यप्राण्यांचा येथे अधिवास अाहे. या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी वन विभागाने यंदा ३६ कृत्रिम पाणवटे तयार केले. तसेच १८ नैसर्गिक पाणवठे अाहेत. त्यात टँकरने पाणी टाकले जाते. मात्र, काही भागात टँकर अाणि वीज पाेहाेचू शकत नाही. त्यामुळे वन विभागाने कूपनलिका करून साैरऊर्जा पंप बसवण्याचा प्रकल्प हाती घेतला. सध्या कूपनलिका खाेदून तीन पंप बसवण्यात अाले. एक पंप पाटणादेवी मंदिरापासून जवळच खडकाळ भागात, दुसरा अाेढरे शिवारात तर तिसरा पंप बाेढरे कन्नड घाटाच्या पायथ्याशी बसवण्यात अाला. साैरऊर्जा प्लेटमुळे २४ तास वीजपुरवठा मिळतो. 

 

७०० व्हॅटची साैरऊर्जा प्लेट, तीन तास वीज  
जंगलातील साैरऊर्जा पंपासाठी ७०० व्हॅटची साैरऊर्जा प्लेट बसवण्यात येत अाहे. त्यास जास्त तापमान नसले तरी वीज तयार हाेऊन पंप चालू हाेऊ शकताे, तर १.५ एचपीचा पंप बसवण्यात येत अाहे. खास जर्मन कंपनीचे पंप मागवण्यात अाले अाहेत. बाेेढरे शिवारात कूपनलिका केली असता २५ फुटांवरच पाणी लागले. हा पंप बंद पडत नाही. एका साैरऊर्जा पंपासाठी बाेअरवेलसह तीन ते साडेतीन लाखांचा खर्च येतो. या पंपाला साैरऊर्जेमुळे किमान सलग तीन तास वीज मिळते.

 

 

बाेढरे पंपाजवळ बिबट्याच्या खुणा  
कन्नड घाटाच्या पायथ्याशी रस्त्यापासून अात जंगलात बसवलेल्या साैरऊर्जा पंपाजवळ नाला अाहे. या नाल्यात पाणी साेडण्यासाठी दिवसातून दाेनदा पंप सुरू केला जाताेे. त्यामुळे तेथे वन्यप्राण्यांची तहान भागते. गेल्या अाठवड्यात बिबट्याच्या पाऊलखुणा अाणि केस या नाल्याजवळ अाढळले. बिबट्या येथे येत असल्याचे त्यातून स्पष्ट हाेते. नीलगायी, रानडुकरे, हरीण व इतर वन्यप्राणी पाणी पिताना प्रत्यक्ष दिसले. वनपरिक्षेत्र अधिकारी एम. बी. पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाने सर्वच साैरऊर्जा पंपांना सुरक्षा जाळी बसवणार, असे वनपाल डी. एस. जाधव म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...